ताज्या घडामोडी

प्रदेशाध्यक्ष मा. माधवरावजी गायकवाड यांचा परभणी जिल्हा राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने सपत्नीक सत्कार

मानवत / प्रतिनिधी.

राष्ट्रीय चर्मकार महासंघाची मूलूख मैदान बुलंद तोफ, गोरगरीब जनतेचे वाली , गरीब जनतेच्या अडी अडचणीला धावून जाणारे , समाजाचे प्रश्न तळमळीने सोडविण्यासाठी महाराष्ट्र भर भ्रमण करणारे राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष , सामाजीक कार्यकर्त्यांचे मार्गदर्शक, मा. माधवरावजी गायकवाड यांच्या वाढदिवसा निमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले होते.
यावेळी भव्यदिव्य अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन, परभणी जिल्हा राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने नांदेड येथील शिव-पार्वती मंगल कार्यालया मध्ये करण्यात आले होते. या वेळी राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने 25 किलो वजनाचा खारीक खोबर्‍याच्या हाराने मा. महादेवरावजी गायकवाड यांचे यावेळी दोन बाय चार ( 2×4 ) ची भव्य प्रतिमा भेट देऊन,
स्वागत करून सपत्नीक सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे परभणी जिल्ह्यातील राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष एस.डी. ठोंबरे, राज्य उपाध्यक्ष नरहरी सोनवणे , मराठवाडा महिला अध्यक्षा सौ. प्रभावतीताई अन्नपूर्वे, मराठवाडा उपाध्यक्ष रामकिसनजी कांबळे , परभणी पूर्व जिल्हाध्यक्ष मा. विनोदजी असोरे, पश्चिम जिल्हाध्यक्ष मुरलीधरजी ठोंबरे, जिल्हा सचिव एम.जी. शेवाळे , परभणी तालुकाध्यक्ष माऊली लोकरे, महादु शिंदे, अक्षय अन्नपूर्वे,आदी सह राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे पदाधिकारी , कार्यकर्ते यांच्या सह समाज बांधव यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

****

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.