https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
क्राईम

नक्षलवाद्यांच्या भीषण हल्ल्यात ११ जवान शहीद

नवी दिल्ली,विशेष प्रतिनिधी :-

गडचिरोली जिल्ह्या लागत असलेल्या छत्तीसगडमधील दंतेवाडा येथे नक्षलवाद्यांनी मोठा हल्ला घडवून आणला असून आयडीच्या स्फोटात 11 जवान शहीद झाले आहेत.

या शहीद झालेल्यांमध्ये 10 डायरेक्ट रिझर्व गार्ड चे  जवान आहेत, तर यात एक चालक आहे.

स्फोटानंतर या भागातील परिसर सील करण्यात आला आहे. या घटनास्थळी मोठ्या प्रमाणात सीआरपीएफचे जवान पाठवण्यात आले आहेत.

प्राप्त माहितीनुसार, दंतेवाडाच्या अरणपूर भागात नक्षलवाद्यांनी आयडीचा स्फोट केला. दंतेवाडा येथील अरनपूर भागात नक्षलवादी लपल्याची बातमी मिळाली होती. या माहितीवरून दंतेवाडा येथील डीआरजी दल नक्षलविरोधी अभियानासाठी अरणपूरला गेले होते. शोध मोहिमेनंतर सर्व जवान परतत असताना माओवाद्यांनी आयडीचा स्फोट केला. यात 11 जवान शहीद झाले आहेत.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704