ताज्या घडामोडी

यशवंत महाविद्यालयातील विद्यार्थिनींचा राज्यस्तरीय “बेस्ट फ्रॉम वेस्ट” स्पर्धेमधील प्रतिकृतीला पहिल्या व तिसऱ्या क्रमांकाचे बक्षिस

नादेड:( दि.२२ फेब्रुवारी २०२४)
आज रोजच्या जीवनातील प्लास्टिक व इतर टाकाऊ वस्तूचे प्रमाण खुप वाढत चालले आहे. त्यामुळे नैसर्गिक समतोल राखणे तितकेच दिवसेंदिवस अवघड होताना दिसत आहे. त्यामुळे टाकाऊ वस्तूंना परत परत उपयोगात आण्याच्या हेतूने एन.ई.एस सायन्स महाविद्यालयात इको फ्रेंडली या समितीचे समन्वयक डॉ.लक्ष्मण शिंदे व सहकाऱ्यांनी नुकतेच “बेस्ट फ्रॉम वेस्ट” या संकल्पनेवर आधारित राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन केले होते.
या स्पर्धेचे उदघाटन माजी खासदार डॉ.व्यंकटेश काब्दे यांनी केले. स्पर्धेत असंख्य शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनि सहभाग नोंदविला होता. श्री.शारदा भवन शिक्षण संस्था संचलित, यशवंत महाविद्यालयातील संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान विभागातील विद्यार्थीनि शुभांगी मिटकरी व शीतल मोरे यांनी भारताच्या इस्रो, जे की अंतराळ संशोधन व अद्यावत उपग्रह निर्मिती करते, यांच्या अग्निबाणाची हुबेहूब प्रतीकृती टाकाऊ केक बॉक्स, ऑनलाईन खरेदीचे बॉक्स पासून बनवली होती.
यास परीक्षकांनी पहिल्या क्रमांकाचे बक्षीस, दोन हजार रुपये, मानचिन्ह व प्रमाणपत्र, तिसऱ्या क्रमांकावर वैशाली पवार , निशीगंधा राऊत यांनी घरातील उपयोगात न येणारे कपडे, प्लस्टिक बॉटल्स, चमचे, चिप्सची रिकामी पाकिटे या पासून सुंदर अशी फुलदानि व त्यावर नारळाच्या कवटी पासून घरातील शोभवंत वस्तू, जे की अतिशय उपयोगी ठरते, यास तिसऱ्या क्रमांकाचे बक्षिस, ज्यात एक हजार रुपये , मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले होते.
या विद्यार्थिनींना विभागातील प्रा.गुरूप्रसाद चौसटे यांनी प्रमुख मार्गदर्शन केल्यामुळे नुकताच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू व विद्यमान प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे यांच्या हस्ते सगळ्यांचे विशेष अभिनंदन केले. त्यात सुषमा लाडेकर, सुष्टी गुप्ता, बसवेश्ववर बिराजदार, वैष्णवी टरके यांनी विशेष सहभाग नोंदविला होता. त्यामुळे त्यांना पण आयोजकाकडून प्रमाणपत्र देउन गौरविण्यात आले.
या प्रसंगी उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे, डॉ.एच.एस पतंगे , अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या प्रमुख डॉ.पद्ममाराणी राव , डॉ.अजय गव्हाणे, विभाग प्रमुख प्रा.नितीन नाईक, डॉ.प्रदीप पाठक , प्रा.प्रवीणकुमार मिरकुटे, प्रा.गौतम दुथडे,प्रा.श्रीकांत जाधव, प्रा.सीमा शिंदे, प्रा.संगीता भुसारे, प्रा.प्रवीण तामसेकर, प्रा.आमरीन खान, प्रा.सचिन वडजे, कार्यालयीन प्रबंधक श्री संदीप पाटील, अधीक्षक श्री कालिदास बिरादार, श्री गजानन पाटील, सहकारी श्री.जगदीश उमरीकर, श्री.जगनाथ महामुने यांनी सुद्धा सर्व विजयी टीमचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.