यशवंत महाविद्यालयातील पद्व्युत्तर इतिहास विभागाची ऐतिहासिक सहल संपन्न
नांदेड:(दि.२४ फेब्रुवारी २०२४)
श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयातील इतिहास पदव्युत्तर विभागातील एम.ए.इतिहास प्रथम व द्वितीय वर्गाच्या विद्यार्थ्यांची भारतीय कला व स्थापत्याचा इतिहास, पर्यटनशास्त्र तसेच संशोधन पद्धती या तिन्ही पेपरच्या निमित्ताने अभ्यास सहल व क्षेत्रभेटीचे आयोजन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू तथा विद्यमान प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन.शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार दि. १६ फेब्रुवारी गुरुवार रोजी छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथील वेरूळ लेणी, देवगिरी किल्ला व बीबी का मकबरा येथे करण्यात आले होते.
ही सहल दि. १५ फेब्रुवारी रोजी रात्री निघून दि. १६ फेब्रुवारी रोजी दिवसभर वेरूळ लेणी ,देवगिरी किल्ला तसेच बीबी का मकबरा, छत्रपती संभाजीनगर हे पाहून दि. १६ फेब्रुवारी रोजी रोजी शुक्रवारी सायंकाळी परत नांदेड कडे परत आली.
या शैक्षणिक सहली दरम्यान ऐतिहासिक स्थळांचे कला, स्थापत्य व पर्यटनाच्या दृष्टिकोनातून महत्व, क्षेत्र भेटीचे महत्त्व विद्यार्थ्यांना कळण्यास मदत झाल्याचे विद्यार्थ्यांनी सांगून समाधान व्यक्त केले.
या शैक्षणिक सहलीचे संचालन इतिहास विभागप्रमुख डॉ.शिवराज बोकडे, डॉ.साईनाथ बिंदगे आणि प्रा.राजश्री जी.भोपाळे यांनी केले होते.