ताज्या घडामोडी
आसामचे मुख्यमंत्री डॉ.सरमा यांचे नांदेड विमानतळावर स्वागत
*
नांदेड दि.२० : तेलंगानातील निर्मल जिल्ह्यात येणाऱ्या भैसा येथील जाहीर सभेसाठी आज आसामचे मुख्यमंत्री डॉ.हिमंत बिस्वा सरमा यांचे दुपारी बारा वाजता श्री. गुरु गोविंदसिंघजी विमानतळ नांदेड येथे आगमन झाले.
यावेळी त्यांचे विमानतळावर स्वागत करण्यात आले.
नांदेडचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, उपविभागीय आधिकारी विकास माने, यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री डॉ.हिमंत बिस्वा सरमा सभा आटोपल्यानंतर विशेष विमानाने पावणे पाचच्या सुमारास नवी दिल्ली येथे प्रयाण करणार आहेत.