https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

आसामचे मुख्यमंत्री डॉ.हिमंता विश्वा शर्मा यांची खा.चिखलीकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट

नांदेड : आसामचे मुख्यमंत्री हिम्मत बिस्ववा हे आज तेलंगणातील निर्मल येथे एका कार्यक्रमाहून परतल्यानंतर त्यांनी खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. या भेटीत अनेक विषयावर चर्चा झाली.
आसामचे भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री हिमंता विश्वा शर्मा हे आज दिनांक 20 फेब्रुवारी रोजी तेलंगणातील निर्मल येथे एका कार्यक्रमाला जाण्यासाठी विमानाने नांदेड विमानतळावर पोहोचले होते. यावेळी खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी त्यांची भेट घेऊन आपल्या निवासस्थानी सदिच्छा भेट देण्याची विनंती केली. त्यानंतर मुख्यमंत्री शर्मा हे निर्मल येथील कार्यक्रम आटोपून परतल्यानंतर खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या साई-सुभाष या वसंतनगर स्थित निवासस्थानी आज भेट दिली. या सदिच्छा भेटीत खा.चिखलीकर, चिखलीकर कुटुंबीय आणि भारतीय जनता पार्टी नांदेडच्यावतीने मुख्यमंत्री हिमंता विश्वा शर्मा यांचा सत्कार आणि सन्मान करण्यात आला. या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानेही विविध विषयावर चर्चा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात आपकी बार 400 चा नारा देण्यात आला असून त्यासाठी नांदेड लोकसभा ताकतीने जिंकण्याची नियोजन करावे, आम्ही आपल्या पाठीशी आहोत, असा विश्वास मुख्यमंत्री शर्मा यांनी यावेळी दिला. यावेळी हे जनता पार्टीचे महानगर अध्यक्ष दिलीप कंदकुर्ते, भाजपा महाविजय 2024 मराठवाडा विभाग संयोजक तथा माजी महानगराध्यक्ष प्रविण साले, प्रदेश कार्यकारणी सदस्य चैतन्यबापू देशमुख, देश कार्य करणे सदस्य मिलिंद देशमुख, भारतीय जनता पार्टीचे लोहा विधानसभा निवडणूक प्रमुख तथा जिल्हा सरचिटणीस प्रविण पाटील चिखलीकर, भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा सौ.प्रणिताताई देवरे – चिखलीकर, युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल पाटील बोरगावकर, बालाजी बच्चेवार, महानगर संघटन सरचिटणीस विजय गंभीरे, व्यंकटेश जिंदम, मंडळ अध्यक्ष आशिष नेरलकर, मंडळ अध्यक्ष सुनिल राणे, अनिलसिंग हजारी, सोशल मीडियाचे लोकसभा संयोजक राज यादव, अक्षय अमीलकंठवार, चक्रधर कोकाटे आदी उपस्थित होते.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704