https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
देश विदेश

६५७ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण, १५० भूखंड वाटप

गडचिरोली,प्रतिनिधी :-

         आत्मसमर्पण योजना सन 2005 मध्ये सुरु झाली असुन आजपर्यंत एकुण 657 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. त्यांच्या पुनर्वसनाकरीता नवजीवन वसाहतीची स्थापना करुन 174 भुखंडापैकी 150 भुखंड आत्मसमर्पीतांना वाटप केले आहे.

        पोलिसानी पुढाकाराने स्थापन केलेले नवजीवन वसाहतीमध्ये 33 सदस्यांचे घरकुल बांधकाम पुर्ण झालेले असुन 14 सदस्यांचे घरकुल प्रगतीपथावर आहे. तसेच नवजीवन वसाहतमध्ये  आत्मसमर्पीतांसाठी सुविधा म्हणुन प्रत्येक घरी नळ, विज, व पथदिवे तसेच समाज मंदिर (गोटुल), माऊली मंदिर चे बांधकाम करण्यात आले. तसेच पाणी पुरवठा योजना, नाली बांधकाम ईत्यादी पायाभुत सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.

पोलीस दल व मैत्री परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने आतापर्यंत एकुण 31 आत्मसमर्पीत नक्षल सदस्यांचे सामुहिक विवाह सोहळ्याच्या माध्यमातुन लग्न करुन देण्यात आले व आजपावेतो 34 आत्मसमर्पीत नक्षल सदस्यांची नसबंदी रिओपनिंग करुन देण्यात आली आहे.

        तसेच आत्मसमर्पीतांना रोजगाराची संधी उपलब्ध होणेकरीता 2 बचत गट स्थापन करुन, 10 महिला व 02 पुरुष  सदस्यांना फ्लोअर क्लीनर फिनाईल तयार करण्याचे एमगिरी वर्धा यांच्या मदतीने प्रशिक्षण दिले. सद्या आत्मसमर्पीत सदस्यांचे 2 बचत गट हे फ्लोअर क्लीनरच्या व्यवसायातुन आत्मनिर्भर झाले आहेत. आत्मसमर्पीत पुरुषांना चारचाकी व दुचाकी वाहन प्रशिक्षण देण्यात आले. त्याचबरोबर एकात्मिक आदिवासी विभाग प्रकल्प गडचिरोली यांचे मदतीने न्युक्लीएस बजट योजने अंतर्गत 86 आत्मसमर्पीत सदस्यांना 50 हजार रु. चे अर्थसहाय्य  व्यवसाय उभारण्यासाठी उपलब्ध करुन देण्यात आले. रोजगार मेळाव्याच्या माध्यमातुन 76 जॉब कार्ड, 34 सदस्यांचे ई-श्रम कार्ड, 39 आत्मसमर्पीत सदस्यांचे महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे कार्ड, 641 आधार कार्ड,  146 पॅन कार्ड, 161 राशन कार्ड, 128 घरकुल वाटप, नवजीवन वसाहत येथे 350 रोपांचे वृक्षारोपन, व शिक्षणाकरीता मुक्तविद्यापीठामध्ये 27 सदस्यांचे प्रवेश करुन देण्यात आले आहेत.     

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704