विशेष अधिवेशनात *सगेसोयरे* या बाजूने मत मांडा सकल मराठा समाजाची लोकप्रतिनिधीकडे मागणी.
मानवत / प्रतिनिधी.
मराठा समाजाला सररकट ओबीसी चे जात प्रमाणपत्र देण्यासाठी सगे सोयरे यांची अट मान्य करण्यात आली. त्या अनूसंगाने राज्य शासनाचे विशेष अधिवेशनाबोलाविले असल्याने ९८ पाथरी विधान सभा मतदार संघाचे आमदार श्री, मा. सुरेशरावजी वरपुडकर यांनी विशेष अधिवेशनात मराठा समाजाच्या मागणी कडे लक्ष देऊन *सगे सोयरे* या विषयावर आपले मत व्यक्त करावे अशी मागणी सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली.
सविस्तर वृत्त असे की, महाराष्ट्र शासनाच्या विशेष अधिवेशना मध्ये *सगे-सोयरे* चा कायदा जशास तसा लागु करावा म्हणुन पाठिंबा देऊन बाजू मांडावी अशी मागणी सकल मराठा समाज यांच्या वतीने एका निवदेनाद्बारे करण्यात आली.
सविस्तर वृत्त असे कि, महाराष्ट्र शासनाच्या दिनांक १६/०२/२०२४ च्या अधिवेशनामध्ये कुणबी मराठा समाज हा ओ.बी.सी मध्ये आरक्षण देण्यात यावे व शासनाच्या आद्यदेशाप्रमाणे सगे-सोयरेचा कायदा जशास तसा लागु करावा म्हणुन पाठिंबा देऊन बाजू मांडण्यात यावी अशा मागणीचे निवेदन सकल मराठा समाजाच्या वतीने अॅड, सूनिल जाधव, अमोल भिसे, यांच्या मार्गदर्शनाखाले देण्यात आले असून निवेदनावर बालाजी आवचार, नारायण आवचार, वैभव निर्वळ, माऊली आंबेगावकर, अनिल जाधव , माऊली आवचार, गजानन बारहात्ते,अमोल निर्वळ, अनिल निर्वळ, विजय जाधव, भारत आवचार, राधाकिशन आवचार, अॅड, ॠषिकेश बारहाते, अशोक होंडे, अरूण देशमूख , श्रीकांत देशमूख , सर्जेराव देशमूख, आकाश काळे, माणिकराव काळे, नामदेव काळे, अनिल जाधव, संतोष होंडे, मारोती होंडे, प्रविण गाडूकर, बाबा काळे , आसाराम काळे, दिगांबर भोसले , पांडूरंग जाधव, दत्ता शिंदे, सूधाकर जाधव, बाळासाहेब कदम, गणेश काळे, नयन शिंदे, आदी सह सकल मराठा समाज बांधवांच्या निवेदनावर स्वाक्षर्या आहेत.
***