परभणी शक्ती* ज्वारी या जातीची मानोली शिवारात पाहणी व हुरडा पार्टी संपन्न.

मानवत / प्रतिनिधी.
मानवत तालुक्यातील मानोली येथे दिनांक 11 फेब्रुवारी रविवारी *परभणी शक्ती* ज्वारी वाणाची पाहणी आणि हुरडा पार्टीचे आयोजन मदन महाराज शिंदे यांच्या शेतात आले होते.
या वेळी *परभणी शक्ति* या वाणाची पाहणी कृषि परभणी विद्यापीठातील संशोधक भास्कर मेहत्रे साहेब व जावळे साहेब यांनी पाहणी केली व नंतर परभणी शक्ती या ज्वारीचा हुरडा बनवून स्वाद घेतला व परभणी शक्ती ज्वारीचे महत्त्व गावातील नागरिकांना सांगितले या ज्वारीमध्ये लोह व झिंक हे घटक शारीरिक पोषक आहेत असे संशोधक भास्कर साहेब यांनी बोलताना सांगितले व नंतर वास्कर साहेब मेहत्रे साहेब व जावळे साहेब यांचा गावकऱ्याच्या वतीने शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी रामभाऊ शिंदे मदन महाराज शिंदे गणेश घाडगे व्यंकटराव शिंदे शेषराव मांडे तुकाराम शिंदे उद्धव सुरवसे पंडित शिंदे विश्वनाथ घुमरे खंडेराव घुमरे शिवाजी मांडे सुरेश विष्णू मांडे यांनी हुरडा पार्टीचा स्वाद घेतला. या वेळी गावातील शेतकरी यांच्यासह नागरिकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती.
***