ताज्या घडामोडी

आधुनिक काळ हा तंत्रज्ञानमय शिक्षणाचा काळ- ॲड.उदयराव निंबाळकर

नांदेड:(दि.१२ फेब्रुवारी २०२४)
विद्यार्थ्यांना आवडीचे शिक्षण देणे गरजेचे आहे.शिक्षकांच्या शिकविण्याच्या पद्धतीवर विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण होत असते. शिक्षणाचे काळानुसार निकष बदलत आहेत. आधुनिक काळ हा तंत्रज्ञानमय शिक्षणाचा असल्याचे प्रतिपादन श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटीचे कोषाध्यक्ष ॲड.उदयराव निंबाळकर यांनी केले.
यशवंत महाविद्यालयात अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या वतीने ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण: २०२०: स्कूल कनेक्ट आणि शिक्षकांचे प्रशिक्षण’ या फॅकल्टी डेव्हलपमेंट कार्यक्रमांतर्गत आयोजित कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी दि. १० फेब्रुवारी रोजी ते बोलत होते.
याप्रसंगी विचारमंचावर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू तथा विद्यमान प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन.शिंदे, उपप्राचार्य डॉ. कविता सोनकांबळे तथा डॉ.हरिश्चंद्र पतंगे, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या समन्वयिका डॉ.एल.व्ही.पदमाराणी राव, आणि श्री.कदम यांची उपस्थिती होती.
याप्रसंगी प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन.शिंदे यांनी, ज्ञान संपादन करण्याच्या प्रक्रियेत भाषेचा अडथळा येऊ नये. मातृभाषेत फार चांगल्या पद्धतीने शिक्षण दिले जाऊ शकते. विद्यार्थ्यांवर करिअर लादल्या जात आहे. ज्ञान हे खऱ्या अर्थाने प्रवाही असावयास हवे. विद्यार्थ्यांना अभ्यास विषय निवडण्याचे स्वातंत्र्य द्यावयास हवे. प्रत्येक विद्यार्थी हा भारताचा चांगला नागरिक कसा होईल, या दिशेने प्रत्येक शैक्षणिक उपक्रम आखावयास हवा, असे विचार व्यक्त केले.
प्रारंभी प्रास्ताविक करताना डॉ.एल.व्ही.पद्माराणी राव म्हणाल्या की, सगरोळी येथील विद्यार्थी व शिक्षकांचा सहभाग या कार्यशाळेत घेतला जात आहे. आपापल्या विषयाच्या विकासासाठी अधिकाधिक काय करता येऊ शकते, याचा विचार शिक्षकांनी निश्चितच करावा.
या सोहळ्याचे सूत्रसंचालन डॉ.रत्नमाला म्हस्के यांनी केले तर आभार डॉ.कैलास इंगोले यांनी मानले.
पुढील सत्रामध्ये डॉ.एम.ए.बशीर, डॉ.मोहम्मद आमेर आणि डॉ.वीरभद्र स्वामी या समितीतील डॉ.वीरभद्र स्वामी यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील विविध पैलूंवर उपस्थितांसमोर प्रकाश टाकला. तदनंतर इंग्रजी, मराठी, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र व इतिहास विषयातील व्याप्ती व विविध संधी या विषयावर अनुक्रमे डॉ.एल.व्ही.पदमाराणी राव, डॉ.संजय जगताप, डॉ.अजय गव्हाणे, डॉ.अजय मुठे व डॉ.शिवराज बोकडे या विभाग प्रमुखांनी विचार मांडले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.भारती सुवर्णकार, प्रा. सरिता वाकोडे, प्रा.किरण देशमुख, प्रा.माधव दुधाटे, डॉ.एस.बी.वानखेडे, डॉ.एम.एम.व्ही.बेग, कार्यालयीन प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील आदींनी परिश्रम घेतले.
या कार्यशाळेस प्रा. राजश्री जी. भोपाळे, डॉ.दिगंबर भोसले, डॉ. शिवाजी सूर्यवंशी, डॉ. साईनाथ बिंदगे, डॉ.ज्ञानेश्वर पुपलवाड आदींची आणि विविध शिक्षक, विद्यार्थी- विद्यार्थिनींची उपस्थिती होती.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.