ताज्या घडामोडी

दैनिक लोकपत्रचा मराठवाडा भूमिपुत्र भूषण पुरस्कार मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांना घोषीत

नांदेड /प्रतिनिधी
दैनिक लोकपत्रचा यावर्षीचा मराठवाडा भूमिपुत्र भूषण पुरस्कार मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांना घोषीत करण्यात आला आहे.दैनिक लोकपत्र नांदेड आवृत्तीच्या ३४ व्या वर्धापनदिनानिमित्त दैनिक लोकपत्रचे संस्थापक संपादक,एमजीएमचे अध्यक्ष,माजी शिक्षणमंत्री आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते श्री.कमलकिशोर कदम यांनी दि ९ फेब्रुवारी रोजी वर्धापनदिनानिमित्त झालेल्या सोहळ्यात ही घोषणा केली.ते या कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी होते.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल,नांदेड महानगर पालिकेचे आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे,नांदेडचे तहसीलदार संजय वारकड विचारमंचावर होते.यावेळी मान्यवरांच्या हस्ते विशेष उल्लेखनीय करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना कार्यगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले. दैनिक लोकपत्रचे कार्यकारी संपादक रवींद्र तहकिक आणि नांदेड आवृत्ती प्रमुख डॉ.गणेश जोशी या प्रसंगी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋषिकेश कोंडेकर यांनी,तर आभारप्रदर्शन प्रशांत गवळे यांनी केले.
मनोज जरांगे पाटील यांनी अतिशय संयम आणि शांततेच्या मार्गाने,विचारपूर्वक,अभ्यासपूर्णतेने आणि नियोजनबद्ध पद्धतीने ,महात्मा गांधीने दाखवलेल्या सत्याग्रह आणि उपोषणाच्या मार्गाने मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी लढा उभारला.सरकारला मराठा समाजचे म्हणणे मान्य करायला भाग पाडले. स्वतंत्र भारताच्या इतिहासातील सर्वसामान्य माणसाचा सहभाग असलेला मनोज जरांगे पाटील यांचा हा लढा महात्मा गांधींच्या चले जाव आंदोलनानंतरचा पहिलाच मोठा लढा ठरला आहे.ग्रामीण भागातील शेतकरी मराठा समाजाचे अभूतपूर्व ऐक्य त्यांनी या निमित्ताने घडवून आणले.कोणतेही आर्थिक किंवा राजकीय पाठबळ नसताना केवळ मनोधर्य,मनोबल,जिद्द,धडाडी,धाडस आणि दुर्दम्य आत्मविश्वासाच्या बळावर मनोज जरांगे यांनी अभूतपूर्व यश मिळवले.आज ग्रामीण-शहरी महाराष्ट्रातील अबालवृद्ध,तरुण-तरुणी. ,महिला भगिनी असा कोट्यवधी मराठा समाज त्यांच्या सोबत आहे.त्यांच्या एका आवाहनावर एकत्र येण्यास तयार आहे.सत्ता,पैसा आणि यंत्रणेशिवाय ही जनशक्ती उभी करण्याची किमया मनोज जरांगे पाटील यांनी साधली आहे.त्यांचा प्रामाणिकपणा आणि स्वच्छ निष्कलंक निरपेक्ष चारित्र्य आणि कार्याप्रती समर्पण हेच त्यांचे भांडवल आहे.राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या नंतर असा चमत्कार करणारे मनोज जरांगे हे दुसरेच असे व्यक्ती आहेत.म्हणूनच दैनिक लोकपत्रचा यावर्षीचा मराठवाडा भूमिपुत्र भूषण पुरस्कार मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांना घोषीत करण्यात येत असल्याचे कमलकिशोर कदम यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्र सरकारने मराठा आरक्षणसंबधीच्या अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर करून कुणबी प्रमाणपत्राच्या आधारे मराठा समाजाला ओबीसी समाजात समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुरु करताच एका विशेष समारंभात हा पुरस्कार मनोज जरांगे यांना प्रदान करण्यात येईल असेही यावेळी कमलकिशोर कदम यांनी सांगितले.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.