ताज्या घडामोडी

ग्रामिण भागातील नामिक बांधवांना मारहान करुन व्हिडियो समाज माध्यमावर प्रसारीत करुन दहशत निर्माण करणाऱ्या गावगुंडावर गुन्हे नोंदविण्याची मागणी : दत्ता चापलकर

नांदेड:

महाराष्ट्राच्या ग्रामिण भागात अत्यअल्प संख्येत नाभिक बांधव राहतो, सध्याची सामाजीक अस्थिरता लक्षात घेता व आरक्षणाच्या वादामुळे अत्यअल्प असलेल्या नाभिक बांधवांना गावगुंडतरुण मारहाण करीत आहेत. मा. छगनराव भुजबळ साहेब यांना शिव्या दे असे धमकाऊन त्यांना मारहाण करण्यात येत आहे, भुजबळ साहेबाच्या अवमान करणारे शब्द वदवुन घेतले जात आहेत, असेच एक प्रकरण भुजंग संतुका शिंदे रा. गौरी शेळगांव ता. नायगाव येथे घडली असुन या वयोवृध्द व्यक्तीस मारहाण करुन त्याचा व्हिडियो समाजमाध्यमावर प्रसारित करण्यात आला आहे. मोटरगा ता. मुखेड येथे ही असेच प्रकरण श्री बाबुराव यांच्या सोबत घडले आहे.अशा घटना समाजमाध्यमावर प्रसारित झाल्यामुळे एकाचे बघुन दुसरीकडे ही हे लोन पसरले असून यामुळे जिल्ह्यातील नाभिक बांधव भयमित व दडपणा खाली आहे.गावगुंडाकडुन येणाऱ्या धमक्यामुळे अन्यायग्रस्त व्यक्ती पोलीसाकडे सुध्दा न्याय मागु शकत नाही, पोलीसाकडे गेल्यास मारहाण करतो अशा धमक्या मिळत आहेत, निवेदनात प्रशासनाला अशी विनंती करण्यात आली आहे की प्रशासकीय यंत्रणा व पोलीस अधिकारी यांना आदेश देऊन दहशत माजवणाऱ्या व सामाजिक सलोखा बिघडणाऱ्या गावगुंडावर गुन्हे नोंदवुन पोलीसाकडुन कार्यवाही करण्यात यावी, जेणे करुन या घटना इतरत्र घडणार नाहीत, अन्यथा नाभिक बांधव हीरस्त्यावर उतरुन आंदोलन करतील याची दखल घ्यावी ही विनती. असे निवेदनात म्हटले आहे सदरील निवेदन नाभिक महामंडळ जिल्हाध्यक्ष नांदेड यांच्याकडून करण्यात आली आहे

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.