https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

आज ऊस ऊत्पादक शेतकर्‍यांच्या भावासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे *सिंगनापूर फाट्यावर रास्ता रोको* आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हा ! स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आवाहन.

मानवत / प्रतिनिधी.

शेतकर्‍यांच्या ऊसाला जिल्हातील काही कारखाने २७०० रूपये भाव देत आहे .पण अमडापूर येथील लक्ष्मी नृसिंह शूगर आणि ट्टेंटिवन शूगर साईखेडा मात्र ऊस ऊत्पादक शेतकर्‍यांची अडवणूक करीत असल्याने या दोन साखर कारखान्याच्या विरोधातसिंगणापूर फाट्यावर रास्ता रोको करण्यात येणार आहे. तरी उस ऊत्पादक शेतकर्‍यांनी मोठ्या संख्येने रास्ता रोको आंदोलनात सहभागी व्हा असे आवाहन विठ्ठल चौखट यांनी केले आहे.
सविस्तर वृत्त असे की,
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे
मा. खा. राजू शेट्टी आपण रात्रंदिवस काबाड कष्ट करुन काळ्या आईच्या कुशीतून उत्पन्न घेतो मात्र या व्यवस्थेमध्ये त्याला मातीमोल भावाने विकणे भाग पडते. केवळ आपण शेतकरी सोडून इतर सर्वजण संघटित रित्या आपल्या घामाच्या दामावर डल्ला मारतात जणु ति लुटारुंची फौजत असते…..! असे असले तरी आपण सर्व शेतकऱ्यांनी जात-धर्म-पक्ष-पंथ यांचे भेद दूर करुन एकत्र येऊ आणि घामाचे दाम मिळवुन घेऊ… या करिता दिनांक १७/०१/२०२४ बुधवार रोजी सकाळी १०.०० वाजता सिंगणापुर फाटा येथे बेमुदत रास्ता रोको आंदोलनास उपस्तिथ राहावे.
या रास्ता रोकोला प्रमुख मार्गदर्शक म्हणुन मा. खा. राजु शेट्टी साहेब (संस्थापक अध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना) यूवा प्रदेशाध्यक्ष दामू आण्णा इंगोले यांची प्रमूख उपस्थित राहणार आहेत. तरी, आपण प्रचंड संख्येने उपस्थित राहावे, असे आव्हान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालूका अध्यक्ष विठ्ठल चौखट तालूका पक्ष अध्यक्ष नामदेव काळे, दतराव पंरांडे , तूकाराम मसलकर , दत्ता काळे , गोपाळराव काळे, अशोक चौखट रवि चौखट , महादेव काळे , शावाजी चौखट , श्रीकांत डासाळकर , आण्णासाहेब चौखट , सुरज चौखट, अशोक काळे , बाळासाहेब काळे , हनूमान पाते, राम चौखट, दत्ता चौखट , ज्ञानोबा चौखट , विलास चौखट, कृष्णा चौखट , लक्ष्णण गायकवाड आदींनी केले आहे.

**

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704