योग चळवळीचा जबरदस्त आधार म्हणजे राष्ट्रीय सेवा योजना :माजी प्राचार्य डॉ.रावसाहेब शेंदारकर

*
नांदेड:( दि.९ जानेवारी २०२४)
राष्ट्रीय सेवा योजना तरुणांमध्ये शिस्तप्रियता आणि कार्यक्षमता निर्माण करत असते. राष्ट्रीय सेवा योजनेने वैचारिक कायापालट होतो. अनेक प्रबोधनात्मक आणि रचनात्मक कार्यक्रम या योजनेच्या माध्यमातून तरुणांपर्यंत जात असतात आणि उद्याचा जबाबदार नागरिक घडण्याचे काम राष्ट्रीय योजनेच्या माध्यमातून होते. त्याचप्रमाणे जगाला भारताने दिलेली देणगी म्हणजे योग साधना. या योग साधनेचा संपूर्ण भारतभर प्रसार करण्याचे काम राष्ट्रीय सेवा योजनेने कार्यक्षमपणे केले आहे, असे प्रतिपादन श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटीचे सहसचिव माजी प्राचार्य डॉ.रावसाहेब शेंदारकर यांनी केले.
यशवंत महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने युवकांचा ध्यास ग्राम-शहर विकास या करीता युवक शिबीर दि.०७ जानेवारी ते १३ जानेवारी या कालावधीत मौजे मरळक, ता.जि. नांदेड येथे संपन्न होत आहे. या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी उद्घाटक म्हणून ते दि.८ जानेवारी रोजी बोलत होते.
याप्रसंगी विचार मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्रीमती श्रीमंताबाई नारायण पोहरे, यशवंत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे, रासेयो विभाग स्वा.रा.ती.म. विद्यापीठ, नांदेडचे संचालक प्रो.डॉ.मल्लिकार्जुन करजगी, प्रमुख व्याख्याते योगानंद स्वामी महाविद्यालय वसमतचे प्रो.डॉ.तोळमारे एस.एस. तसेच मरळक गावचे उपसरपंच बालाजी नामदेवराव कदम, गावातील प्रतिष्ठित व्यक्ती गंगाधरराव धोंडजी कदम,
राष्ट्रीय सेवा योजना कक्षाचे कार्यक्रमाधिकारी डॉ.बालाजी भोसले, डॉ.दिगंबर भोसले, प्रा.मीरा फड, प्रा.अभिनंदन इंगोले, प्रा.कांचन गायकवाड,डॉ.कैलास इंगोले, प्रा.राजरत्न सोनटक्के,प्रा.राजश्री जी.भोपाळे आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक आणि स्वयंसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राष्ट्रीय सेवा योजनेचे निवासी शिबिराचे उद्घाटन यशस्वीरित्या संपन्न झाले. प्रस्तुत कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी डॉ.बालाजी भोसले यांनी तर सूत्रसंचालन डॉ.दिगंबर भोसले यांनी केले. शेवटी आभार प्रा.अभिनंदन इंगोले यांनी मानले.
या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे तथा डॉ.हरिश्चंद्र पतंगे, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या समन्वयिका डॉ.एल.व्ही.पदमारानी राव, कार्यालयीन प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, प्रसिद्धी समिती समन्वयक डॉ.अजय गव्हाणे यांनी सहकार्य केले.