मानवत व्यापार पेठेत कापूस उत्पादक शेतकर्यांची लूट थांबवा. राजेभाऊ शिंदे.

मानवत / प्रतिनिधी.
सि. सि. आय कडून रेनटच कापूस आणि ई -पिक पाहणी अहवालाचा जाचक अटी लावून शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचे काम बंद करा राजेभाऊ काकडे यांची मागणी
मानवत तालुक्यात सि. सि. आय कडून रेनटच कापूस आणि ई – पिक पाहणी अहवालअशा जाचक अटी लावून शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचे प्रयत्न केला जात आहे ते तात्काळ बंद करावे अशी मागणी मानवत येथील शेतकरी राजेभाऊ काकडे यांनी मा. परभणी जिल्हाधिकारी यांच्या कडे एका निवेदना द्वारे केली आहे.
सद्या बळी राजा विविध संकटांना सामोरे जात असून त्यातच खते, बियाणे, फवारणी, आणि लागवड इत्यादी वाढता खर्च यामुळे शेतकऱ्याचे अगोदरच पार कंबरडे मोडले असून यातच आता मानवत तालुक्यात सि. सि. आय कडून रेनटच कापूस आणि ई – पिक पाहणी अहवालाचा जाचक अटी शेतकऱ्यांना लावून वेठीस धरण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामुळे शेतकरी त्रस्त झाला असून या जाचक अटी रद्द करून शेतकऱ्याचा कापूस खरेदी करावा.
अशी मागणी तालुक्यातील शेतकरी राजेभाऊ काकडे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
***