https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

यशवंत ‘ चे जलतरण स्पर्धेत सुयश

नांदेड:(दि.१३ डिसेंबर २०२३)
श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयातील प्रा.ओमप्रकाश गुंजकर आणि डॉ.श्रीरंग बोडके यांना स्विमिंग असोसिएशन ऑफ छत्रपती संभाजीनगर तर्फे आयोजित आंतरशालेय आणि मास्टर्स जलतरण स्पर्धा २०२३ मध्ये दि.१० डिसेंबर रोजी एकूण चार सुवर्ण व रौप्य पदक प्राप्त झाले आहे.
कनिष्ठ महाविद्यालयातील समाजशास्त्र विभागातील प्रा.ओमप्रकाश नागनाथराव गुंजकर यांना ५० मीटर फ्री, बॅक आणि बटरफ्लाय जलतरण स्पर्धेत प्रत्येकी एक सुवर्णपदक प्राप्त झाले आहे.
वरिष्ठ महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ.श्रीरंग सटवाजी बोडके यांना ५० मीटर ब्रेस्ट स्पर्धेत रौप्य पदक प्राप्त झाले आहे.
या सुयशाबद्दल स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र- कुलगुरू तथा विद्यमान प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन.शिंदे यांनी प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन दोन्ही विजेत्यांचे यथोचित सत्कार आणि गौरव केले.
तसेच उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे तथा डॉ.हरिश्चंद्र पतंगे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.कबीर रबडे, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या समन्वयिका डॉ.एल.व्ही.पदमाराणी राव, कार्यालयीन प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, प्रा.नरेंद्र कंचटवार, प्रा.सचिन अपस्तंभ, प्रा.श्रीकांत सोमठाणकर, डॉ.एकनाथ मिरकुटे, जगन्नाथ महामुने, डॉ.वीरभद्र स्वामी, डॉ.अजय गव्हाणे, डॉ.साहेब शिंदे, डॉ.सुरेश तेलंग, डॉ.एम. एम.व्ही.बेग, डॉ.अंजली जाधव, डॉ. वानखेडे, डॉ.सचिन पाटील आदींनी अभिनंदन केले आहे.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704