https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

एम सी आर न्यूज कवयित्री आपल्या भेटीला “स्वभाव”.लैलेशा भुरे

एम सी आर न्यूज कवयित्री आपल्या भेटीला "स्वभाव".लैलेशा भुरे

               स्वभाव

स्वभावाला अनेक पैलू असतात.आपल्याला आपल्या अवतीभवती वेगवेगळा स्वभाव असलेले लोक भेटत असतात.आता स्वभाव म्हणजे नेमकं काय?याची व्याख्या जर करायची झाली तर आपल्या बाह्य आणि आंतरिक मनातून अनेक विचार आकार घेत असतात.या विचारांतून आपला स्वभाव घडत असतो.आपण नेहमीच म्हणतो की स्वभावाला औषध नाही आणि हे ब-याच प्रमाणात खरेही आहे.स्वभावाचे अनेक प्रकार आपण बघत असतो.प्रेमळ, मायाळू,तापट,राकट, एकलकोंडा, स्वार्थी,नि: स्वार्थी, दानशूर इत्यादी.काहींचा स्वभाव वरवरून जो दिसतो तसा असेलच असेही नाही.एखादी व्यक्ती बाहेरून जरी रागीट वाटत असेल तरी आतून ती फारच प्रेमळ असते.काहींचे स्वभाव मुळातच ठरलेले असतात,तर काहींचे स्वभाव कालांतराने बदलत जातात.असे होण्याचे कारण म्हणजे ती व्यक्ती ज्या लोकांसोबत राहते त्यांच्यासारखेच विचार ती व्यक्ती करायला लागते.मग अशावेळी त्या व्यक्तीचा मूळ स्वभाव बदलतो.म्हणजेच काय तर स्वभावात दुसऱ्या भावाची वाढ होते.स्वभाव आपल्याला बदलता येतो का? होय… नक्कीच.त्यासाठी थोडे परिश्रम घेण्याची गरज आहे.कित्येकदा नातेसंबंध दुरावण्याचे मुख्य कारण आपला स्वभाव असतो.स्वभावातील गुण व दोष पारखून योग्य तो बदल करण्याची आपली दांडगी इच्छा हवी.अनेक घरांत आपण बघतो की अगदी लहानसहान गोष्टींवरून वाद सुरू होतात ज्याचे रूपांतर मोठ्या कलहात होते.ज्यामुळे मने दुखावली जातात आणि नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतो.याचे दूरगामी परिणाम होतात आणि त्याचा त्रास घरातील सर्वांनाच भोगावा लागतो.अशावेळी अंतर्मनास थोड्या सुचना केल्यास कलह निर्माण न होता अनेक प्रसंग आपण सकारात्मकतेने हाताळू शकलो असतो याची जाणीव आपल्याला उशिरा होते.अनेकदा आपली चूक नसताना सुद्धा काही लोक आपल्याला डिवचत असतात.अशावेळी अशा लोकांच्या नादी न लागता दुर्लक्ष करणे हा अगदी सोपा उपाय आहे.
स्वभावात सुविचारांची साठवण आणि दुषित विचारांची पाठवण केली तर आपले समोरच्या व्यक्तीसोबत चांगले जमू शकते.चांगल्या स्वभावाने माणसे जोडली जातात हे जरी खरे असले तरी किती प्रमाणात आपण समोरच्या व्यक्तीशी चांगले वागू शकतो ते समोरच्या व्यक्तीवरही अवलंबून असते.आपण चांगले वागायचे मात्र समोरची व्यक्ती आपल्याशी नीट वागत नसेल किंवा दुजाभाव
करीत असेल तर मग अशा लोकांच्या दूरच राहिलेले बरे.कारण प्रत्येकवेळी आपला चांगूलपण दाखवून उपयोग नसतो.काही लोक आपणच कसे बरोबर आहोत हे आपल्या हट्टी स्वभावाने सिध्द करण्याचा प्रयत्न करीत असतात. सात्विक आणि तात्विक स्वभाव जोपासण्याचा काही प्रमाणात आपण प्रयत्न करू शकतो.

 

 

 

 

 

 

 

मानसिक आरोग्य ठीक असेल तर सर्वकाही ठीक राहू शकतं.त्यासाठी मनाची एकाग्रता फार मोलाची आहे.मानसिक आणि शारीरिक आरोग्य स्वभाव बदलण्यासाठी उपयुक्त ठरतात.त्यासाठी आपण योगा, ध्यानधारणा, प्राणायाम यांसारख्या अनेक गोष्टी करू शकतो.त्यामुळे सकारात्मक शक्तीची निर्मिती होऊन आपले आचार-विचार चांगले होतात.पर्यायाने आपल्या स्वभावात चांगला बदल घडतो.प्रत्येकाला आपल्या स्वभावातील गुण-दोष माहित असतात.रोज रात्री जर आपण आपल्या दिवसभरातील घडामोडींचा अभ्यास केला तर आज आपले काय चुकले,काय करायला हवे होते याचे मंथन करून दुसऱ्या दिवशी त्याच चुका परत होणार नाही याची खबरदारी घेतली की स्वभावात हळूहळू चांगले परिवर्तन व्हायला सुरुवात होते.त्यामुळे आपल्या आचार विचारातून दुषित भाव निघून शुध्द भाव आपल्या मनात वावर करतो.एक गोष्ट मात्र नक्की की आपला स्वभाव कितीही चांगला असला किंवा इतरांशी कितीही चांगले वागलो तरी सर्व आपल्याला चांगले समजतीलच असे नाही.तरीसुध्दा आपण आपल्या गोड स्वभावाने जितकं चांगलं वागता येईल तेवढे वागण्याचा प्रयत्न करीत राहावे.पुरेशी झोप,सकस आहार यांसारख्या गोष्टींमुळे आपला मेंदू शांत राहतो.एकदंरीत काय तर आपल्या वाणीवर ब-याच प्रमाणात नियंत्रण ठेवून आपण सुंदर स्वभाव विकसित करू शकतो.
**************************
लैलेशा भुरे
नागपूर

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704