https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

नेताजी सुभाष माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात , *महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

मानवत / प्रतिनिधी.

येथील नेताजी सुभाष शिक्षण संस्थेच्या नेताजी सुभाष माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालया मध्ये महामानवास अभिवादन करण्यात आले.
महामानव भारतरत्न डॉ. बाबसाहेब अंबेडकर यांच्या 67 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या स्मृतीसअभिवादन करण्यात आले
याप्रसंगी कार्यक्रर्माचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्यध्यापक श्री, एन.बी. सिसोदिया होते. तर प्रमूख पाहुणे म्हणून उपमुख्यध्यापक श्री. उद्धवराव हरकाळ व प्रर्यवेक्षक श्री.व्ही.पी. बुधवंत तर प्रमूख उपस्थिती श्री. अशोक काळे सर श्री रामराव हेंडगे व मार्गदर्शक म्हणून श्री अशोक हरकाळ यांची प्रमूख उपस्थिती होती.
यावेळी कार्यक्रर्माचे सूत्र संचालन व आभार प्रदर्शन श्रीमती कुसुमताई कनकुटे यांनी केले.
या वेळी कार्यकर्माच्या सुरवातीला विश्वरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मान्यवर यांच्या हस्ते पुष्प हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित एक गीत 10 वी ड मधील विद्यार्थिनी कु.सृष्टी माकुडे आणि कु.वैष्णवी दिशागत यानी सादर केले. नोटीस बोर्ड वर महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे अतिशय सुंदर असे चित्र विद्यालयातील कु.श्रेया संजय लाड हिने काढल्याबद्दल तिचे मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन कौतुक करण्यात आले.
तसेच या प्रसंगी कु.आनंदी बोरबने कु.कच्छवे कु.आर्या बारहाते या विद्यार्थिनी नी अतिशय उत्कृष्टपणे पणे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर भाषणे केली.
तर या वेळी विद्यालयातील परीक्षा प्रमुख श्री.अशोक हरकाळ यानी विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारातून आपण आपल्या जीवनात चांगले उच्चविचार, शिक्षण,आत्मविश्वास, इत्यादी गुणांची अत्यंत आवश्यकता आहे असे मत आपल्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना पटवून दिले.
कार्यक्रमाच्या शेवटी मुख्याध्यापक सिसोदिया यांनी अध्यक्षीय समारोप प्रसंगातील आपल्या अतिशय महत्वपूर्ण मार्गदर्शन पर भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अतिशय प्रतिकूल अशा वर्ण व्यवस्था असणाऱ्या परिस्थितीत उच्च शिक्षण घेऊन “आपल्या देशाचे संविधान लिहून सर्व सामान्य नागिकांपर्यंत हक्क आणि अधिकार दिले हे आपले भाग्यच आहे”अशा अनेक त्यांच्या महान कार्याचे महत्व विद्यार्थ्याना सांगितले. या वेळी कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी यांची या प्रसंगी उपस्थिती होती तसेच या वेळी विद्यालयातील शिक्षकवृंद प्रामुख्याने श्री.बैस सर, श्री.सिरसकर सर, होंडे सर, एस.एस.चव्हाण सर, सावंत सर वाडकर सर,रणेर सर,भाबळे सर नाईक सर, बंडे सर,कडतन सर सत्वधर सर श्रीमंती डोके मॅडम, श्री.भास्कर झोल व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची या वेळी उपस्थिती होती.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704