https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

पेटंटच्या सहाय्यानेच देशाची प्रगती शक्य-:.नरेंद्र चव्हाण

नांदेड:(दि.१७ फेब्रुवारी २०२४)
आपल्या देशात संशोधन आणि पेटंट हा विषय दुर्लक्षित विषय म्हणून गणला जातो. शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये पेटंटचे बिज रोवणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण पेटंटच्या सहाय्यानेच देशाची प्रगती होत असते. पेटंटमध्ये शेती या घटकाला प्राधान्य देणे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन श्री.शारदा भवन एज्युकेशन सोसायटीचे कार्यकारणी सदस्य आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य श्री.नरेंद्र चव्हाण यांनी केले.
यशवंत महाविद्यालय व वुईगो लायब्ररी फाउंडेशन, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मास्टरिंग द माझे: डिमेन्सिफाइल इंटिलेकचुअल प्रॉपर्टी राइट्स’ या विषयावरील एक दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते.
याप्रसंगी विचारमंचावर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू तथा विद्यमान प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे, संशोधन विकास समितीचे समन्वयक डॉ. एम.एम.व्ही.बेग, नाशिक येथील स्मिता माने, निलेश पावसकर, पराग खेडकर, रावसाहेब घेगडे, निनाद कुलकर्णी, पुणे येथील डॉ.निखिल पाठक यांची उपस्थिती होती.
प्रारंभी प्रास्ताविकात प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे यांनी, आज प्रत्येक घटकामध्ये पेटंट नोंदणी करण्याकडे जगाचा कल आहे. पेटंटच्या नोंदणीनंतरच त्यावरील उत्पादनाचा मालकी हक्क प्राप्त होत असतो. आजचे युग पेटंट व ट्रेडमार्कचे आहे. पाणी बाटलीचे उत्पादन करणाऱ्या प्रत्येक कंपनीचा स्वतःचा ट्रेडमार्क आहे. मुख्य म्हणजे सामाजिक शास्त्र शाखेतील संशोधकांनी पेटंटकडे वळणे गरजेचे आहे. पारंपारिक मार्गाचा त्याग करून आधुनिकतेचा स्वीकार प्रत्येकाने करावा.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मदन अंबोरे यांनी केले. याप्रसंगी झालेल्या प्रश्नोत्तर सत्रात प्रा.भारतीय सुवर्णकार, प्रा.पी.पी.सीसोदिया, डॉ.कैलास वडजे, डॉ.परमेश्वर पोळ, डॉ.योगेश नकाते आदींनी सहभाग घेतला.
कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या समन्वयिका डॉ.एल.व्ही.पदमाराणी राव, उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे तथा डॉ.हरिश्चंद्र पतंगे, डॉ.श्रीरंग बोडके, डॉ. संभाजी वर्ताळे,डॉ.संजय ननवरे, डॉ. व्ही.सी.बोरकर, डॉ.कैलास वडजे, डॉ. अजय गव्हाणे, डॉ.निरज पांडे, डॉ. बी. बालाजीराव, डॉ.अजय मुठे, डॉ. विजय भोसले, डॉ.मदन अंभोरे, डॉ.योगेश नकाते, प्रा.ए.आर.गुरुखुडे, डॉ. रत्नमाला म्हस्के, डॉ.कैलास इंगोले, डॉ.दीप्ती तोटावार, कार्यालयीन प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादर व गजानन पाटील, संजय भोळे, प्रशांत मुंगल आदींनी सहकार्य केले.
या कार्यशाळेस प्राध्यापक व संशोधक विद्यार्थ्यांचा मोठ्या संख्येने सहभाग होता.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704