यशवंत ‘ मधील प्रा.ओमप्रकाश गुंजकर यांचे राष्ट्रीय स्तरावर सुयश
नांदेड:(डॉ प्रवीणकुमार सेलूकर)
श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत कनिष्ठ महाविद्यालयातील समाजशास्त्र विषयाचे प्रा.ओमप्रकाश नागनाथराव गुंजकर यांना गोवा येथे ८ ते १३ फेब्रुवारी २०२४ दरम्यान संपन्न झालेल्या सहाव्या राष्ट्रीय मास्टर्स गेम्स जलतरण स्पर्धेत तीन पदके प्राप्त झाली आहेत.
त्यांना १०० मीटर बॅकस्ट्रोक स्पर्धेत आणि २०० मीटर फ्रीस्टाइल स्पर्धेत सिल्वर आणि ५० मीटर बॅकस्ट्रोक स्पर्धेत ब्रांझ पदक प्राप्त झाले आहे.
या सुयशाबद्दल स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र- कुलगुरू तथा विद्यमान प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन.शिंदे, उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे तथा डॉ.हरिश्चंद्र पतंगे, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या समन्वयिका डॉ.एल.व्ही.पदमाराणी राव, डॉ.एम.एम. व्ही.बेग, कार्यालयीन प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, डॉ.श्रीरंग बोडके, डॉ.अजय गव्हाणे, डॉ. रामराज गावंडे, राष्ट्रीय छात्र सेनेचे संचालक प्रा.श्रीकांत सोमठाणकर, प्रा.नरेंद्र कंचटवार, डॉ. एकनाथ मिरकुटे, प्रा.सचिन अपस्तंभ, बालाजी गाडे, सेवानिवृत्त वन अधिकारी गोपाळ गुंजकर, सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक किशोर गुंजकर, श्रीकांत गुंजकर आदींनी अभिनंदन केले आहे.