आरोग्य व शिक्षण

राज्यस्तरीय वक्तृत्व व निबंध स्पर्धेत वसंतराव नाईक महाविद्यालयाची घवघवीत यश

नांदेड(प्रतिनिधी राज गायकवाड संपादक)-समाज कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय भाषण आणि निबंध स्पर्धेत येथील वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. वसंतराव नाईक महाविद्यालयाची विद्यार्थीनी कु. सुहानी पवार (बीएससी प्रथम वर्ष) व नितीन वाढवे (एम ए द्वितीय) यांनी या स्पर्धेत बक्षीसांची लयलूट केली. या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शेखर घुंगरवार यांच्या हस्ते महाविद्यालयामध्ये दोन्हीही विद्यार्थ्यांचा स्वागत आणि सत्कार समारंभ घेण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये मिळालेल्या यशाबद्दल मनोगत व्यक्त करून सगळ्यांना याबद्दल धन्यवाद दिले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शेखर घुंगरवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी अशा वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये सातत्याने सहभागी होऊन यश मिळवावे, असे आवाहन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. व्यंकटेश देशमुख यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. नागेश कांबळे यांनी मानले. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. व्ही. आर. राठोड, डॉ. जी वेणुगोपाल, डॉ. पी. बी. बिरादार, डॉ. कागणे आर. एम., डॉ. लिंगमपल्ले जी एल, डॉ. गच्चे ए. जी., डॉ.डी. एस. पालीमकर, डॉ. पी. एल. चव्हाण, डॉ. गरुड एस. बी., डॉ. साहेबराव शिंदे, डॉ. एस. बी. गिरे, डॉ. कपिल हींगोले, प्रा. शशिकांत हाटकर,डॉ. दत्ता खरात, डॉ. संधू, डॉ. शेटे एस. व्ही., डॉ मोरे व्ही. व्ही., डॉ. गणेश ईजळकर डॉ. धारबा रणवीर, प्रा. नितीन मुंडलोड, डॉ. राहुल सरोदे,
यांच्यासह महाविद्यालयातील वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील सर्व प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तथा विद्यार्थी यांची उपस्थिती होत.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.