https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

क्रिकेटच्या पंच पॅनलवर नांदेडच्या दर्शनकुमारची निवड

नांदेड:
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या राज्यस्तरीय क्रिकेट पंच पॅनल परीक्षेत नांदेडच्या दर्शनकुमार विश्वनाथराव खेडकर यांनी उज्वल यश मिळवले. जुलै महिन्यात झालेल्या लेखी परीक्षेतून संपूर्ण महाराष्ट्रातून १९७ उमेदवारांमधून नांदेडच्या दर्शनकुमारने ९६ गुण मिळवत द्वितीय क्रमांक पटकावला आणि ८० जणांत पुढील टप्प्याच्या प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षेसाठी त्याची निवड झाली होती.ऑगस्ट महिन्यात प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षेत महाराष्ट्रातील ४८ उमेदवारांची निवड झाली.यामध्ये दर्शनकुमार हा नांदेड जिल्ह्यातील एकमेव उमेदवार ठरला.
या एकंदर समग्र परीक्षेच्या अंतिम निकालात दर्शनकुमार खेडकर यांनी ९४.५ गुण मिळवत महाराष्ट्रात द्वितीय क्रमांक मिळवला.नांदेडच्या या पंचाची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या पंच पॅनल (एमसीए पॅनल) वर नियुक्ती होत आहे.यामुळे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या महाराष्ट्रभर दरवर्षी नियमितपणे होणाऱ्या राज्यस्तरीय खुल्या तसेच विविध वयोगटातील आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेत यांना पंच म्हणून प्राधान्य मिळेल. यांनी मिळवलेल्या यशाबद्दल मिताली क्रिकेट ॲकॅडमी चे संस्थापक आणि मुख्य प्रशिक्षक नंदकिशोर कृष्णुरे (पाटील), सहाय्यक प्रशिक्षक शुभम लोहार व व्यवस्थापक अजिंक्य लाटकर यांनी त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704