https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
आरोग्य व शिक्षण

विद्यार्थ्यांनी स्वयं प्रकाशीत व्हावे . प्राचार्य डाॅ. एच . बी . राठोड

नांदेड प्रतिनिधी: इंदिरा गांधी महाविद्यालय , सिडको नांदेड येथील पदव्युत्तर भूगोल विभाग व संशोधन केंद्र ओझोन दिन , भूगोल अभ्यास मंडळ उद्‌घाटन व गुणवंतांचा सत्कार कार्यक्रम ओयोजित केला होता . या कार्यक्रमात प्रमुख पाहूने म्हणून बोलताना डॉ.एच .बी.राठोड म्हणाले की , विद्यार्थ्यांनी स्पर्धेच्या युगात आपले अस्तित्व टिकवायचे असेल तर काळानुरूप आपल्यात बदल करून ज्ञानाने स्वयं प्रकाशित होण्याची गरज आहे . तसेच ते म्हणाले की , भूगोल विषय हा विद्यार्थ्यांना सर्वाधिक संधी उपलब्ध करून देणारा विषय आहे. तो व्यवस्थित समजून घेऊन आपले. भवितव्य उज्ज्वल करून घ्यावे . ओझोन हा वायू पृथ्वीवरील सजीव सृष्टीसाठी अतिशय महत्वाचा वायू आहे.त्याचे महत्व समजून घेऊन त्याच्या संरक्षणासाठी सर्वानी प्रयत्न करणे आवश्यक आहे . या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . आर.पी.माळी हे होते . अध्यक्षीय समारोप करताना ते म्हणाले की भूगोल हा विषय विज्ञान शाखा व मानन्यविज्ञान शाखेला जोडणारा महत्वाचा विषय आहे . विद्यार्थ्यांनी ओझोन दिनाचे महत्व समजुन घेऊन ते समाजापर्यंत पोहचवणे काळाची गरज आहे.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भूगोल विभाग प्रमुख डॉ .नामदेव वाघमारे यांनी केले . प्रास्ताविकामध्ये भूगोल विभागाचा दिवसेंदिवस वाढत चाललेला गुणवत्तेचा आलेख मांडला. तसेच ओझोन दिन साजरा करण्याचा व भूगोल अभ्यास मंडळाची स्थापना करण्याचा उद्देश स्पष्ट केला . प्रमुख पाहूण्यांचा परिचय डॉ . भागवत पस्तापूरे यांनी करून दिला . तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा . संध्या आढाव योनी केले तर आभार प्रदर्शन डॉ . कविता बोधले यांनी केले . विद्यापीठामध्ये मेरीट आलेल्या कल्पना लामदाडे,प्रियंका यादव व सीमा वारकरे या गुणवंतांचा सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी भूगोल अभ्यास मंडळाच्या कार्यकारीणी बोर्डाचे अनावरण , वसुंधरा भित्तीपत्रकाचे अनावरण करण्यात आले . या प्रसंगी भित्तीपत्रक उत्कृष्ठ करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये किरण हंकारे भूगोल विभागाद्वारे आयोजित भूगोल सामान्य ज्ञान परीक्षेत प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये दिपक कांबळे व नवनाथ गायकवाड यांचा पारितोषिक देऊन विद्यार्थ्याचा सत्कार करण्यात आला . या कार्यक्रमास भूगोल विभागातील ब्रम्हानंद बोईबारे प्रा.‌सटवा मेटकर , डाॅ.बालाजी आव्हाड , डाॅ. अर्चना दोडे तसेच डॉ . ए.टी. शिंदे ,डाॅ. जी . एस . पाटील , डॉ राम मेटकर , डॉ . हनुमंत भोपाळे , डॉ . एल . टी . काळे. प्रा.डाॅ. मोहोकार, . प्रा . अपसतंभ प्रा.जाकारे , डाॅ रंजना आडकिने , प्रा.छाया कदम , प्रा विद्या काकडे प्रा . मंजूषा प्रा. शशीकांत हाटकर बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.

RAJ GAIKWAD

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704