https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
देश विदेश

असे केले वनविभागाने वाघीणीला केल जेरबंद

गडचिरोली,प्रतिनिधी :-

शहरातील  कृषी विभागाच्या सोनापूर येथील रोपवाटिकेत शिरलेल्या वाघिणीला गडचिरोली वनविभागाने व जलद कृती दल, ताडोबाच्या मदतीने जेरबंद करण्यात यश मिळविले. 

सकाळी १० वाजताच्या सुमारास एक वाघीण कृषी विज्ञान केंद्र सोनापूर येथील रोपवाटिकेत  रानडुक्कराचा पाठलाग करताना तिथे काम करणाऱ्या मजुरांना दिसली,  कृषी विभागाच्या सोनापूर केंद्राचे प्रमुख डॉ. कराळे यांनी लगेच ही माहिती  वनसंरक्षक डॉ किशोर मानकर याना दिली.

रोपवाटिकेला सर्व बाजूंनी भिंत असल्याने तिला बाहेर निघता येत नव्हते. त्यामुळे गडचिरोली वनवृत्ताचे वनसंरक्षक किशोर मानकर यांच्या मार्गदर्शनात गडचिरोली वनविभागाचे उपवनसंरक्षक मिलिश दत्त शर्मा, सहाय्यक वनसंरक्षक सोनल भडके व गडचिरोली वनपरिक्षेत्राचे प्रभारी अधिकारी धीरज ढेंबरे हे तात्काळ घटनास्थळी उपस्थित होऊन सदर वाघिणीला जेरबंद करण्यासाठी प्रयत्न सुरू केले.

लागलीच ताडोबा येथिल जलद कृती दलाचे डॉ. रविकांत  खोब्रागडे यांचे सोबत अजय मराठे व त्यांची टीम दुपारी २ वा. घटनास्थळी पोहचली. वनविभागाच्या व जलद कृती दलाच्या टीमने वाघिणीचा शोध घेऊन तिला ४ वाजून १८ मिनिटांनी बेशुद्ध करून ४ वाजुन ५५ मिनिटांनी तिला पिंजऱ्यात टाकून वनविभागाच्या सुरक्षित स्थळी हलविण्यात आले.

वनविभागाचे पशुवैद्यकीय अधिकारी वाघिणीची तपासणी करून प्रधान मुख्य वनसंरक्षक( वन्यजीव) पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. गडचिरोली जिल्ह्यात सर्वत्र घनदाट जंगल आहे, शहरालगत सुद्धा जंगल असल्याने अंधार झाल्यावर जंगल असलेल्या परिसरात फिरण्याचे टाळावे असे आवाहन डॉ किशोर मानकर ह्यांनी केले.

वाघीण पकडण्यात पोलीस विभागाने व कृषी विज्ञान केंन्द्राच्या कर्मचारी यांनी मदत केल्या बद्दल मिलिश शर्मा उपवनसंरक्षक गडचिरोली ह्यांनी आभार मानले आहे. वाघ बघण्यासाठी लोकांची मोठी गर्दी जमल्यामुळे पोलिस व वन विभागाला शर्ती चे प्रयत्न करावे लागले.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704