ताज्या घडामोडी
सामान्य रुग्णालयात दारूचा महापूर
उदय धकाते
गडचिरोली,प्रतिनिधी :-
जिल्हा मुख्यालयी असलेल्या जिल्हा सामान्य रुग्णालय,गडचिरोली येथे दारूचा महापूर आला आहे. गडचिरोली जिल्ह्यात दारू बंदी आहे.परंतु जिल्हा रुग्णालय येथे मात्र दारू पिणाऱ्याना बंदी नसल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालय मध्ये गडचिरोली-चंद्रपूर जिल्ह्यातील रोज हजारो रुग्ण उपचार घेण्यासाठी येत असतात.या रुग्णालयामधील ओपीडी मध्ये रोज शेकडो रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक सोबत येत असतात. ओपीडी च्या बाजूला असलेल्या वतार पंप जवळ व अन्य ठिकाणी रोज शेकडो च्या संख्येने दारू च्या रिकाम्या बाटल्या आढळून येत असून या कडे सामान्य रुग्णालय च्या प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
जिल्हा मुख्यालयी असलेल्या जिल्हा सामान्य रुग्णालय,गडचिरोली येथे दारूचा महापूर आला आहे. गडचिरोली जिल्ह्यात दारू बंदी आहे.परंतु जिल्हा रुग्णालय येथे मात्र दारू पिणाऱ्याना बंदी नसल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. pic.twitter.com/vBXrrxUWIw
— mahabharat news (@mahabharatnews3) April 24, 2023