अभंग प्रतिष्ठाणच्या वतीने *डाॅ. एन.बी. दगडू* यांच्या वाढ दिवसा निमित्त साने गूरूजी वाचनालयास पूस्तके भेट.

मानवत / प्रतिनिधी.
मानवत शहरातील प्रतिष्ठित नागरीक तथा समाज सेवक मा. गणेश मोरे पाटील यांच्या अभंग प्रतिष्ठानच्या वतीने मानवत शहरातील प्रसिध्द मानवत मल्टी – पेशालिटी हाॅस्पिटलचे जेष्ठ वैद्यकिय अधिक्षक मा. डॉ एन बी दगडू यांचा वाढदिवस साजरा करून शहरातील साने गुरुजी वाचनालयाला दहा हजार रुपयाची वाचनिय पुस्तके भेट देण्यात आली.
यावेळी मानवत नगरीचे शिल्पकार तथा विकास पुरूष युवानेते डॉ अंकुश लाड, मानवत पोस्टेचे नूतन पोलिस निरिक्षक मा. दिपक दंतुलवार के.के.एम. महाविद्यालयाचे माजी प्राचार्य ए.बी. चिंदूरवार, मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीचे यूवा संचालक श्री. ज्ञानेश्वर मोरे पाटील,मानवत व्हाईस पत्रकार संघाचे अध्यक्ष कचरूलालजी बारहाते युवा उद्योजक विशालसा कडतन,दै.लोकमत चे पत्रकार सत्यशिलजी धबडगे , किशोरजी तुपसागर यांच्या सह साने गूरूजी वाचनालयाचे पदाधिकारी व कर्मचारी या वेळी उपस्थित होते.
***