एम सी आर
Uncategorized

स्वारातीम विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा

नांदेड: प्रतिनिधी
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीतील स्वागत कक्षामध्ये शनिवार, दिनांक ६ जून, २०२६ रोजी शिवराज्याभिषेक दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमाला विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन, नवोपक्रम व नवसंशोधन साहचर्य मंडळाचे संचालक डॉ. शैलेश वाढेर, प्लेसमेंट ऑफिसर डॉ. बालाजी मुधोळकर, आणि जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.
तसेच शिवराम लुटे, नारायण गोरे, प्रमोद देशमुख, संदीप एडके, उद्धव सातपुते, शैलेश कांबळे, बाबुराव हंबर्डे, तुकाराम हंबर्डे, नरसिंग कागडा, बबन हिंगे आदींसह विद्यापीठातील प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
———————

Share

Related posts

प्रा. डॉ. ज्ञानोबा मुंढे यांना अयोध्या येथील त्रेतायुग फाउंडेशनचा ‘नॅशनल प्राईड अँड एक्सलन्स अवॉर्ड 2026’ जाहीर

Chief Editor

नांदेड: शहरातील डी मार्ट रस्त्यावर तिहेरी हत्याकांड; गँगवॉरनंतर रुग्णालयातही खून

Chief Editor

आकाशा गावकवाड मृत्यू प्रकरणी आरोपींना तात्काळ अटक करा; पीडित कुटुंबाला १ कोटींची मदत देण्याची मागणी

Chief Editor

स्वारातीम विद्यापीठात प्रभारी वित्त व लेखाधिकारीपदी डॉ. राजेश शिंदे यांची नियुक्ती

Chief Editor

माता रमाई यांच्या त्यागामुळे कोटी कोटी कुळांचा उद्धार -डॉ.अजय गव्हाणे

Chief Editor

प्रा.ओमप्रकाश गुंजकर यांचे सागरी जलतरण स्पर्धेतील सुयश आनंददायी -माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण

Chief Editor

Leave a Comment