https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
क्राईम

फरार दोन जहाल नक्षलवाद्यास गडचिरोली पोलीस दलाने केले अटक

गडचिरोली,प्रतिनिधी :-  

पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलीस दलाने सन २००६/०७ पासुन फरार असलेल्या दोन जहाल नक्षलवाद्यांना सुमारे एक वर्षापासून पाळत ठेवून हैद्राबाद येथून अटक केले आहे. या अटकेमध्ये एक महिला व एक पुरुष नक्षल्यांचा समावेश आहे.या अटकेमुळे नक्षल चळवळीला जबर हादरा बसला आहे. 

नक्षलवादी माहे फेब्रुवारी ते मोहे मे दरम्यान टीसीओसी कालावधी पाळतात. टीसीओसी कालावधीत नक्षलवादी हे सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे, पोलीस दलावर हल्ले करून त्यांच्या जवळील शस्त्रे लुटून नेणे, रस्ते व इतर प्रकारचे सरकारी कामात अडथळे आणून जाळपोळ करणे इ. देशविघातक कृत्य करत असतात. नक्षलवाद्यांच्या देशविघातक कृत्यांना गडचिरोली पोलीस दल नेहमीच सामोरे जाऊन आळा घालतात, याच टीसीओसी कालावधीच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलीस दलाने सन २००६/०७ पासुन फरार असलेल्या दोन जहाल नक्षलवाद्यांना सुमारे एक वर्षापासून पाळत ठेवून हैद्राबाद येथून अटक केले आहे. 

पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांचे मार्गदर्शनाखाली गडचिरोली पोलीस दलाचे सपोनि. सचिन झनक व सपोनि शिवहरी सरोदे यांच्या नेतृत्वात जवानांनी गोपनियरित्या अभियान राबवून दोन जहाल नक्षलवाद्यांना हैद्राबाद येथुन आज दिनांक २० फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी अटक केली आहे.

त्यामध्ये पुरुष नक्षली नामे टुगे ऊर्फ मधुकर चिनन्ना कोडापे, वय ४२ वर्षे याचा समावेश असून तो उपपोस्टे मरपल्ली अंतर्गत येत असलेल्या मौजा बस्वापूर, तह, अहेरी, जि. गडचिरोली येथील रहीवासी आहे. तो अहेरी दलममध्ये सदस्य या पदावर भरती झाला असून, सन २००२ पासुन सिरोंचा दलममध्ये कार्यरत होता. तसेच सन २००६ पर्यंत अहेरी, जिमलगटटा व सिरोंचा दलममध्ये कमांडर पदावर कार्यरत राहुन दलम सोडुन फरार झाला होता. त्याच्यावर ९ खुन, ८ चकमक, २ दरोडा, ४ जाळपोळ, १ खुनाचा प्रयत्न व १ इतर असे एकुण २५ गुन्हे दाखल आहेत. तसेच महाराष्ट्र शासनाने त्याचेवर एकुण ८ लाख रुपयाचे बक्षीस जाहीर केले होते. अटक करण्यात आलेली महिला नक्षली नामे शामला ऊर्फ जामनी मंगलु पुनम, वय ३५ वर्षे, ही बंडागुडम, बासागुडा, जि. बिजापूर (छत्तीसगड) येथील रहीवासी असून, ती अहेरी दलममध्ये सदस्य पदावर कार्यरत होती तीचेवर आजपावेतो १ खुन, ५ चकमक, १ जाळपोळ, १ दरोडा व १ इतर असे एकुण ०९ गुन्हे दाखल आहेत. तसेच महाराष्ट्र शासनाने तीचेवर एकुण ०२ लाख रुपयाचे बक्षीस जाहीर केले होते. 

प्राप्त माहीतीनुसार शामला ऊर्फ दसरु पुंगाटी ही जहाल नक्षली नामे दुगे ऊर्फ मधुकर चिनन्ना कोडापे याची पत्नी असून, दोघेही नक्षल दलममध्ये कार्यरत राहून सन २००६ मध्ये फरार झाले होते. दलम सोडतांना टुगे ऊर्फ मधुकर चिनन्ना कोडापे हा कमांडर व त्याची पत्नी शामला ऊर्फ दसरु पुंगाटी ही सदस्य पदावर कार्यरत होती.

सन २००६ मध्ये दलम सोडल्यानंतर कुणालाही त्यांचा थांगपत्ता लागू नये म्हणून तेलंगणा व आंध्रपदेश राज्यामध्ये सतत विविध ठिकाणे बदलवून पोलीस दलास गुंगारा देत आपली स्वत:ची ओळख लपवून ते राहायचे, तसेच हैद्राबाद येथे स्वतःची ओळख लपवून टुगे ऊर्फ मधुकर चिनन्ना कोडापे हा तेथील स्थानिक सुरक्षा कंपनीत वॉचमन या पदावर काम करत होता व त्याची पत्नी शामला ऊर्फ जामनी मंगलु पुनम ओळख लपवुन एका कारच्या शोरुममध्ये हाऊस किपींग मध्ये काम करत होती. दोघेही नक्षल पती-पत्नी हे सध्या हैद्राबाद येथे वास्तव्यास असल्याच्या मिळालेल्या गोपनिय माहीतीवरुन गडचिरोली पोलीस दलाने खून, जाळपोळ, चकमक, दरोडा अशा देशविघातक कृत्य करणाऱ्या दोन्ही जहाल नक्षलवाद्यांवर सुमारे एक वर्षापासुन गोपनियरित्या पाळत ठेवून दोघांनाही आज अटक केली. 

गडचिरोली पोलीस दलाच्या प्रभावी कारवाईमुळे माहे जानेवारी २०२२ ते आतापर्यंत एकूण ६४ नक्षलवाद्यांना अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आलेले आहे. सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक नीलोत्पल,अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता,अपर पोलीस अधीक्षक, अहेरी यतिश देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली पार पडली. तसेच मा. पोलीस अधीक्षक यांनी नक्षलवाद्यांना नक्षलवादाची हिंसक वाट सोडुन आत्मसमर्पण करुन सन्मानाने जीवन जगण्याचे आवाहन केले आहे.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704