सामाजीक
सण, उत्सवाच्या दिवशी ध्वनीक्षेपक व वाद्य वाजविण्याची परवानगीबाबत आदेश

गडचिरोली,प्रतिनिधी :-
शासननिर्णयाच्या अनुषंगाने केंद्र शासनाच्या ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) सुधारित नियत 2017 च्या नियम 5 उपनियम (3) व त्यासोबत दिलेल्या स्पष्टीकरणात्मक टिप्पणीनुसार ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक इत्यादींच्या वापराबाबत श्रोतृगृहे, सभागृहे, सामुहिक सभागृहे आणि मेजवानी कक्ष यासारख्या बंद जागांखेरीज इतर ठिकाणी, जिल्ह्याच्या निकडीनुसार वर्षामध्ये 15 दिवस निश्चित करुन सकाळी 06 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत सुट जाहिर करण्याकरीता संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना राज्य शासनाद्वारे प्राधिकृत केलेले आहे. जिल्हाधिकारी यांनी संबंधित ध्वनी प्राधिकरण तथा जिल्हा पोलिस अधिक्षक यांच्याशी सल्लामसलत करुन 15 दिवस जाहिर करण्याचे निर्देश आहेत.
पोलीस अधिक्षक, गडचिरोली यांचे पत्रानुसार चालु वर्षात पुढीलप्रमाणे दिवस निश्चित करुन सण, उत्सवाच्या दिवशी ध्वनीक्षेपक व वाद्य वाजविण्याची परवानगी सकाळी 06.00 वा. ते रात्रो 12.00 वा.पावेतो निर्धारीत करुन आदेश निर्गमित होणेस विनंती केलेली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज जयंती- 1 दिवस (दिनांक 19.02.2023), डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती- 1 दिवस (दिनांक 14.04.2023), 01 मे, महाराष्ट्र दिन – 1 दिवस, गणपती उत्सव – 3 दिवस (दुसरा, सातवा व अनंत चतुर्थदशी), ईद ए मिलाद- 1 दिवस (दिनांक 28.09.2023), नवरात्री उत्सव – 2 दिवस (अष्टमी, नवमी), विजयादशमी- 1 दिवस (दिनांक 24.10.2023), दिवाळी- 1 दिवस (लक्ष्मीपूजन दिनांक 12.11.2023), ख्रिसमस – 1 दिवस (दिनांक 25.12.2023), 31 डिसेंबर – 1 दिवस (दिनांक 31.12.2023).