https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
सामाजीक

मालु कोपा बोगामी हे भामरागड व एटापल्लीचे असामान्य नेतृत्व

गडचिरोली,प्रतिनिधी :-

भामरागड तालुक्यातील लाहेरी येथे तालुका कॉंग्रेस कमिटी तर्फे 10 फेब्रुवारी 2023 ला स्वर्गीय मालु बोगामी यांची 21 वी पुण्यतीथी साजरी करण्यात आली.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश आदिवासी कॉंग्रेसचे अध्यक्ष डॉ. नामदेव उसेंडी यांनी पुण्यतीथी कार्यक्रमात बोलतांना मालु बोगामी यांचा जन्म 1948 ला लाहेरी येथे झाला. त्या काळात लाहेरी हे गाव अतिशय दुर्गम असून शिक्षण, रस्ते, वीज याची कुठलिही सोय नसतांना मालु बोगामी यांचे आई -वडील अशिक्षित असुन सुध्दा आपला मुलगा शिकला पाहीजे या पुरोगामी विचाराने मालु बोगामी यांची  शिक्षणाची सोय केली या विचाराला साथ देवून मालू बोगामी यांनी सुध्दा लाहेरी ते चांदा पर्यंत शिक्षणाची मजल गाठली. त्या शिक्षणाच्या आधारे त्यांना शिक्षकाची नोकरी सुध्दा मिळाली. परंतू एटापल्ली व भामरागड परिसरातील आदिवासींना अंगावर कपडे, पोटभर अन्न, शिक्षण व आरोग्य सुविधांचा अभाव असल्याचे त्यांना दृश्य पाहावेसे न झाले शिक्षणाचा उपयोग आपल्यापुर्ती मर्यादित न ठेवता तो भामरागड – एटापल्ली तालुक्यातील सर्व समस्या जनतेचा प्रश्न सोडविण्यासाठी उपयोगात यावा म्हणुन शिक्षकी पेशाचा राजीनामा देवून सामाजीक व राजकीय क्षेत्रात काम करण्यासाठी हा प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी उडी घेतली. त्याच माध्यमातुन त्यांना  एटापल्ली व भामरागड पंचायत समितीचे सभापती होण्याचा मान मिळाला हि संधी मिळताच त्यांनी एटापल्ली – भामरागड परिसर पिंजून काढला.

गडचिरोली जिल्हा कॉंग्रेस  कमिटीचे अध्यक्ष पद भुषवूण लाहेरी सारख्या अतिदुर्गम भागाचा नाव लौकीक करुन मुंबई ते दिल्ली पर्यंत पोहचविले. कॉंग्रेस सर्वधर्म समभावाचा विचार घेवून आयुष्यभर झटले या विकासाचा महामेरु म्हणुन ओळखल्या जाणारा व्यक्तीमत्वाचा हुरगोळी केल्यानेच 10 फेब्रवारी 2002 ला त्यांची नक्षलवादयाकडून हत्या करण्यात आली. त्यांच्या निधनाने एटापल्ली – भामरागड तालुक्यातील विकासाचा बुलंद आवाज हरपला परंतु त्यांच्या विकासाच्या दृष्टीने नियोजन केलेला विकास आजही एटापल्ली – भामरागड तालुक्यात दिसून येतो हे कदापि विसरता येणार नाही.

 

यावेळी माजी खासदार मारोतराव कोवासे, माजी आमदार पेंटाराम तलांडी, महासचिव डाॅ. नामदेव किरसान, जि.प. माजी अध्यक्ष अजय कंकडालवार, अहेरी रुग्णालयाचे डॉ. कन्ना मडावी, माजी तालुकाध्यक्ष मुस्ताक हकीम, माजी जि. प. सदस्या सगुणा तलांडी, प्रदेश महासचीव विश्वजीत कोवासे, माजी नगराध्यक्ष राजू वड्डे, अनु.जाती जिल्हाध्यक्ष रजनीकांत मोटघरे, तालुकाध्यक्ष लक्ष्मीकांत बोगामी, मादी आत्राम, उज्वला बोगामी, तलांडी आदि उपस्थित होते.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704