एम सी आर

स्वारातीम’ विद्यापीठात ‘कला आणि संस्कृती उन्हाळी शिबिर २०२६’चे आयोजन

Uncategorized

नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील ललित व प्रयोगजीवी कला संकुल आणि विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कला आणि संस्कृती उन्हाळी शिबिर २०२६’चे आयोजन कुलगुरू डॉ मनोहर चासकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. या शिबिरातून विद्यार्थ्यांना कला, संस्कृती आणि सर्जनशीलतेचा अनुभव देण्याचा उद्देश आहे.
या शिबिरात नृत्य, नाट्य, गायन व वादन, छायाचित्रण तसेच चित्रकला अशा विविध कलाप्रकारांचा समावेश असून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाणार आहे. “धमाल मोज, गंमत, शिक्षण आणि सर्जन” या संकल्पनेवर आधारित हे शिबिर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारे ठरणार आहे.
शिबिराचा कालावधी ५ ते २० मे २०२६ असा असून दररोज सायंकाळी ४.३० ते ६.३० या वेळेत सत्रे होणार आहेत. ५ ते १५ वयोगटातील मुला-मुलींसाठी हे शिबिर खुले आहे. प्रवेशासाठी अंतिम तारीख ४ मे २०२६ असून प्रवेश शुल्क रुपये १५००/- निश्चित करण्यात आले आहे.
या शिबिरासाठी इच्छुकांनी ऑनलाइन नोंदणी करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी डॉ. शिवराज शिंदे ( 9099945996) आणि प्रा. राहुल गायकवाड (9049043844) यांच्याशी संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.
या उपक्रमाचे संयोजन विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. राजपालसिंह चिखलीकर तसेच ललित व प्रयोगजीवी कला संकुलाचे संचालक डॉ. पृथ्वीराज तौर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.
उन्हाळ्याच्या सुट्टीत विद्यार्थ्यांनी कला शिकून सर्जनशील होण्याची संधी या शिबिरातून उपलब्ध होणार असल्याने पालक व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाने केले आहे
—————–

Share

Related posts

विज्ञान आणि आरोग्य यांच्या समन्वयामुळे समाज सुदृढ बनू शकतो – डॉ. नितीन जोशी यांचे प्रतिपादन

Chief Editor

दिनांक 07 जानेवारी 2026 रोजी बी.सी.ए. विभागाकडून Data Science व AI या विषयावर एक दिवसीय विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळेचे आयोज

Chief Editor

विचारांची आणि मनाची स्वातंत्रता हीच खरी लोकशाही- प्रा डॉ सुधीर गव्हाणे

Chief Editor

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, दाताळा कंधार तालुक्यात प्रथम

Chief Editor

यशवंत ‘ मध्ये पर्यावरणशास्त्र ग्रंथाचे प्रकाशन

Chief Editor

व्यवस्था बदलल्याशिवाय स्त्रीमुक्ती अशक्य – कॉ. किरण मोघे

Chief Editor

Leave a Comment