https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

सावळी येथे जागतिक स्तनपान सप्ताह साजरा

मानवत / प्रतिनिधी

मानवत तालुक्यातील मौ. सावळी येथे ०३ ऑगस्ट रोजी जागतिक स्तनपान सप्ताह साजरा करण्यात आला. दर वर्षी ०१ ऑगस्ट ते ०७ दरम्यान जागतिक स्तनपान सप्ताह आयोजित करण्यात येतो याच अनुषंगाने सावळी येथे स्तनपान सप्ताह साजरा करण्यात आला.
या वेळी स्तनदा मातांना विविध विषयी मार्गदर्शन करण्यात आले तसेच नुकत्याच जन्म झालेल्या आपल्या बाळासाठी आईचे दूध किती महत्वाच असते, स्तनपानाची योग्य पद्धत, आदी विषयी स्तनदा व गरोदर मातांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमास सावळी ग्राम पंचायतीच्या सन्माननिय सरपंच सौ. अनुजा माणिकराव काळे, अंगणवाडी ताई राजश्री काळे पौळ, आरोग्य उपकेंद्राचा आरोग्य सेविका सौ. राणी हनुमान राहटे, अंगणवाडी मदतनीस सौ. मिरा बापूराव अंभोरे, सौ. रंजना सीताराम घनसावंत, आशा रंजना भागीरथ कांबळे यांच्या सह यावेळी स्तनदा व गरोदर मातांची मोठया संख्येने उपस्थिती होती.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704