https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

यशवंत ‘मधील जैवतंत्रज्ञान विभागाचे सुयश

नांदेड:( दि. ७ ऑगस्ट २०२३)
श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयातील जैवतंत्रज्ञान विभागातील अजय कासोलड या विद्यार्थ्याने जेआरएफ नेट, सेट व गेट परीक्षेत तसेच प्रवीण अनमोड या विद्यार्थ्याने जेआरएफ नेट या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेत उत्तीर्ण होऊन यश संपादन केले आहे.
या सुयशाबद्दल या दोन्हीही विद्यार्थ्यांचे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू तथा विद्यमान प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे यांनी सत्कार केला आहे.
याप्रसंगी उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे तथा डॉ.हरिश्चंद्र पतंगे, अंतर्गत गुणवत्ता हमी पक्षाच्या समन्वयिका डॉ.एल.व्ही.पदमाराणी राव, जैवतंत्रज्ञान विभागप्रमुख डॉ.एम.एम. व्ही. बेग, डॉ.ए.आर.सूर्यवंशी, डॉ.व्ही.बी. पाटील, डॉ.बी.वाय.गोट्टीगोल्ला, प्रा.एस. एस.सूर्यवंशी, डॉ.आर डी.कोल्हे, कार्यालयीन प्रबंधक संदीप पाटील, कार्यालयीन अधीक्षक कालिदास बिरादार गजानन पाटील आदींनी अभिनंदन केले आहे.
——————————————-

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704