https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
आपला जिल्हा

गडचिरोली वनवृत्तात अस्तिवात असलेल्या व मृतक वाघांची सखोल चौकशी करा  

गडचिरोली,प्रतिनिधी :-

                                    गडचिरोली वनवृत्तात मोठ्या प्रमाणात वाघाचे व बिबट यावन्य प्राण्यांचे वास्तव्य आहे. सदर वन्य प्राणी ही राष्ट्राची संपत्ती असुन ती संरक्षण व संवर्धन करणे काळाजी गरज आहे. मागील काही काळापासून गडचिरोली वनवृत्तात 7 वाघांचा व इतर बिबट्यांच्या मृत्यूच्या घटना घडलेल्या आहेत. यातील काही वाघ व बिबट यांची शिकार झाल्याची शक्यता असल्याचे गडचिरोली जिल्ह्यात चर्चा असून वरील राष्ट्रीय प्राण्यांची संरक्षण व संवर्धनाची जबाबदारी वनवृत्ताचे प्रमुख म्हणून वनसंरक्षक, गडचिरोली यांची असतांना याबाबीकडे वनसंरक्षक, गडचिरोली यांनी दुर्लक्ष केलेले आहे.

                                    सदर गडचिरोली जिल्ह्यात मृत वाघ व बिबट प्रकरणाची सखोल चौकशी करून दुर्लक्ष करण्याऱ्या वनसंरक्षक, गडचिरोली यांचेवर कार्यवाही होणे गरजेचे असल्याने सदर घडलेल्या सर्व घटनांची योग्य चौकशी करून दोषी वनसंरक्षक, गडचिरोली यांचेवर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी भारतीय मानवाधिकार परिषद चे प्रदेशाध्यक्ष गजेंद्र डोमळे यांनी पत्रकार परिषदेतून केली आहे.

                                    गडचिरोली वनवृत्तात माहे सप्टेंबर 2021 व ऑक्टोंबर 2021 मध्ये वनसंरक्षक, गडचिरोली यांच्या चुकीच्या अहवालावरून नर वाघास नरभक्षक घोषित करून वरिष्ठांकडुन परवानगी घेवून वनसंरक्षक, गडचिरोली यांनी नरभक्षक वाघ (नर) यांस जेरबंद करण्याची मोहीम राबविली. सदर मोहिमेवर जवळपास 70 ते 80 लाख रूपये खर्च करण्यात आले. सतत 2 महिने सदर मोहिम राबवूनही नरभक्षक वाघ जेरबंद करण्यात आले नाही. मात्र याच क्षेत्रात मनुष्यहानीच्या व पशुधनहानीच्या घटना याच कालावधीत झाल्याने सदर मोहिम अयशस्वी झाल्याचे स्पष्ट होत असल्याने सदर मोहिमेकरीता सर्व बांबीवर झालेला 70 ते 80 लाख रूपयांचा खर्च शासनाचा निधी बुडालेला आहे. याबाबतीत वनसंक्षक, गडचिरोली यांचे योग्य नियोजन झाले नसल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे सद मोहिम अयशस्वीतेकरीता वनसरंक्षक, गडचिरोली यांचेवर जबाबदारी निश्चित होत आहे.

                                    वाघास जेरबंद करण्याच्या मोहिमेत प्रधान मुख वनसंरक्षक (वन्यजीव) नागपूर यांनी दिलेल्या पत्र क्र. 3156 दि. 08/01/2018 च्या मार्गदर्शक सुचना पुर्णत:ह जाणून बुजून टाळून वरिष्ठांना खोटा अहवाल सादर करण्याऱ्या वरिष्ठांवर फौजदारी गुन्हा नोंदवून त्यांना निलंबित करण्याची मागणी गजेंद्र डोमळे यांनी केली आहे.

                                    सदर मोहिम राबविण्यास झालेला सर्व बाबींवरील खर्च सुमारे 70-80 लाख रूपये वनवृत्ताचे प्रमुख वनसंरक्षक, गडचिरोली यांचे कडुन वसुल करून शासनाचा निधी व्यर्थ खर्च केल्याबाबत त्यांचेवर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी.

                                    दिनांक 05/01//2022 रोजी गडचिरोली वनवृत्त, वडसा वनविभागात साखरा बिटात वाघ जखमी अवस्थेत असल्याची बाब संबंधीत वनरक्षकाचे लक्षात आली.  त्यांनी सदर माहिती वरिष्ठांना दुपारी 1.30 वा. दिली. मोक्यावर वरिष्ठ अधिकारी आले ही व सांयकाळी 7.30 वा. वाघाचा मृत्यू झाला. दरम्यानच्या 5 तासाच्या काळात वरिष्ठांनी तातळीणे जखमी वाघावर उपचार करण्याची कोणतीही कार्यवाही केली नाही. या 5 तासात वेळीच संबंधित जखमी वाघावर उपचार झाले असते तर नक्कीच वाघाचे प्राण वाचविण्यात यश आले असते किंवा यश आले नसतेही पण प्रयत्न तर करायला पाहिजे होते. ते केले नाही यात वरिष्ठांचा अक्षम्य असा दोष स्पष्ट दिसत आहे. ज्यानी ही चुक केली आहे त्या वरिष्ठांना याचा जाब विचारणे क्रमप्राप्त आहे. व ते त्यांनी उपचार करण्यास दिरंगाई किंवा निष्काळजी पणा केला असल्यास तसेच हाकेच्या अंतरावर वनवृत्त कार्यालय असतांना वनसंरक्षक, गडचिरोली यांनी याबाबतीत वेळीच दखल का घेतली नाही ? यामध्ये त्यांचाही निष्काळजीपणा दिसुन येत आहे असा गंभीर आरोप भारतीय मानवाधिकार परिषद चे प्रदेशाध्यक्ष गजेंद्र डोमळे यांनी पत्रकार परिषदेतून केली आहे.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704