एम सी आर
Uncategorized

पदव्युत्तर व व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या उन्हाळी-२६ परीक्षांसाठी अर्ज सादरीकरणास मुदतवाढ

नांदेड:
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठांतर्गत पदव्युत्तर व व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या उन्हाळी-२०२६ परीक्षांसाठी अर्ज सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.
विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या पदवी, पदविका व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या उन्हाळी-२०२६ परीक्षांना दिनांक १६ एप्रिल २०२६ पासून सुरुवात होणार आहे. या परीक्षांसाठी ऑनलाईन अर्ज स्वीकृतीची अंतिम मुदत २९ मार्च २०२६ होती, तर शुल्क भरण्याची अंतिम तारीख ३० मार्च २०२६ होती. तथापि, अनेक महाविद्यालयांकडून अर्ज सादरीकरणाबाबत आलेल्या विनंत्या व विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून ही मुदत वाढविण्यात आली आहे.
सुधारित वेळापत्रकानुसार, ऑनलाईन परीक्षेचे अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख ४ एप्रिल २०२६ पर्यंत वाढविण्यात आली असून, RTGS द्वारे शुल्क भरण्याची अंतिम तारीख ६ एप्रिल २०२६ निश्चित करण्यात आली आहे. तसेच, संबंधित महाविद्यालयांनी त्याच दिवशी परीक्षेचे अर्ज विद्यापीठात सादर करणे बंधनकारक राहील.
ऑनलाईन अर्ज भरण्यासाठीची लिंक दिनांक १ एप्रिल २०२६ पासून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सर्व संबंधित विद्यार्थी व महाविद्यालयांनी याची नोंद घेऊन मुदतीत अर्ज सादर करावेत, असे आवाहन विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक यांनी केले आहे.
यानंतर कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ दिली जाणार नसून, महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे अर्ज वेळेत सादर करणे आवश्यक आहे. नियमांचे पालन न केल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असे परीक्षा मूल्यमापन मंडळाचे संचालक हुशारसिंग साबळे यांनी कळविले आहे.
—-+++—-

Share

Related posts

धर्माबाद येथे ग्रंथदान उपक्रम : १६,७३९ रुपयांचे ९० ग्रंथ महाविद्यालयाला भेट

Chief Editor

स्वारातीम’ विद्यापीठात ‘कला आणि संस्कृती उन्हाळी शिबिर २०२६’चे आयोजन

Chief Editor

यशवंत ‘ मधील डॉ.मीरा फड यांची राज्यस्तरीय निवड

Chief Editor

तहसिलदार* पांडूरंग माचेवाड यांच्या हस्ते सोमवारी तहसिल प्रांगणात शासकीय ध्वजारोहन

Chief Editor

स्वामी विवेकानंद संकुलात जागतिक महिला दिवस साजरा

Chief Editor

अण्णा भाऊ साठे जागतिक कीर्तीचे महान मानवतावादी लेखक : डॉ. शरद गायकवाड*

Chief Editor

Leave a Comment