https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
सामाजीक

“चला जाणुया नदीला” या अभियानाचे नदी संवाद यात्रेच्या पोटफोडी गुरुवळा नदीच्या पात्रात शुभारंभ

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत 

गडचिरोली,प्रतिनिधी :-

महाराष्ट्र शासना द्वारे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत माजी राष्ट्रपति ए.पी.जे. अब्दुल कलाम ह्यांचे  जयंती  प्रित्यर्थ महाराष्ट्रातील ७५ नदयांना  चला जाणुया नदीला या अभियानाची सुरुवात नदी संवाद यात्रा काढून १५ ऑक्टोबर  रोजी करण्याचा जी आर काढून सुरुवात करण्याची घोषणा केले होते। त्यानिमित्याने आज १५ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी १०.३० वाजता पोहार / पोटफोडी नदीचे गुरुवळा येथे नदीच्या पात्रात गडचिरोली चिमूर चे खासदार  अशोक नेते ह्यांच्या हस्ते नदी संवाद यात्रेच्या वेळी चला जाणुया नदीला या कार्यक्रमाचे शुभारंभ करण्यात आले. 

या कार्यक्रमाप्रसंगी खा.अशोकजी नेते बोलतांना मानवी संस्कृतीचा उदय आणि विकास नदीच्या काठी झाला. मानवाच्या आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनात नदीचे विशेष महत्व आहे.मानवी जीवन समृद्ध करण्यासाठी नदी आपल्याला इतके काही देते, ज्यातून मानवाची संस्कृती विकसित आणि समृद्ध होते,त्यासाठी नदीपात्रात प्लास्टिक,विसर्जित केलेल्या देवांच्या मुर्ती, फोटो, चपला, जोडे, सिगारेटची पाकिटे, दारूच्या बाटल्या, डिटर्जंट पावडरचे रिकामे पाऊच, टायर, ट्यूब्ज, दगड, इत्यादी नदीमध्ये टाकून नाये.नदीच्या पाण्यामुळे अनेक प्राणीमात्रांचे प्राण सुद्धा वाचले जाते.त्यामुळे नदीचे संवर्धन करून सर्वांनी नदी स्वच्छ ठेवणे काळाची गरज आहे.असे प्रतिपादन या कार्यक्रमाप्रसंगी खा.अशोकजी नेते यांनी केले. 

नदी संवाद यात्रेच्या वेळी चला जाणुया नदीला या शुभारंभ कार्यक्रमा प्रसंगी गडचिरोली चे उपविभागीय अधिकारी मैनक घोष (आईएएस) हे विशेष अतिथि म्हणून उपस्तिथाना मैनक घोष यानी नदी चे विविध उदाहरणसांगून महत्व समझाउन सांगितले। विशेष म्हणजे यावेळी  मुख्य अतिथि खासदार अशोक नेते यानी  नदी संवाद यात्रेच्या वेळी चला जाणुया नदीला यशश्वी करण्याकरिता  आपल्या हस्ते वसुंधरा युक्त शुभ कलस गुरुवळा ग्रामपंचायत ची सरपंचा श्रीमती दर्शना भोपये यांना सुपुर्द केले तसेच गडचिरोली चे उपविभागीय अधिकारी मैनक घोष (आईएएस) यानी आपल्या हस्ते खादी चा गुरुवळा ग्रामपंचायत चे उपसरपंच प्रकाश बांबोडे यांना तिरंगा प्रदान करुण शुभेच्छा दिले. 

त्याच प्रमाणे कार्यकारी अभियंता श्री. गणेश परदेशी, सरपंचा श्रीमती दर्शना भोपये  यानी आपले विचार व्यक्त केले आणि खास म्हणजे विश्व शांतिदूत प्रकाश आर अर्जुनवार शासनांचा नदी संवाद यात्रेच्या वेळी चला जाणुया नदीला त्यामागचा जनहितार्थ उद्देश्य विषद करुण उद्देश्यपूर्ति होण्याकरिता सर्वांकडून सहकार्याची अपेक्षा केले.

 नदी संवाद यात्रेच्या वेळी चला जाणुया नदीला या शुभारंभ कार्यक्रमा प्रसंगी गडचिरोली चे तहसीलदार महेंद्र गणवीर, पाटबंधारे सिंचन विभाग गडचिरोली चे उप कार्यकारी अभियंता श्री. गणेश परदेशी,  उप विभागीय अभियंता श्री. अमित डोंगरे, गुरुवळा ग्रामपंचायत ची सरपंचा श्रीमती दर्शना भोपये, उपसरपंच प्रकाश बांबोडे, प्रमुख अतिथि तसेच नदी संवाद यात्रेच्या समन्वयक म्हणून एकता सामाजिक शिक्षण संस्था गडचिरोली चे संस्थापक सचिव विश्व शांतिदूत प्रकाश आर अर्जुनवार प्रामुख्याने उपस्थित होते. 

 कार्यक्रमाचा प्रस्तावना उप विभागीय अभियंता अमित डोंगरे यानी संचालन प्रा- हर्षल गेडाम व आभार प्रदर्शन नवयुग विद्यालय गुरुवळा चे मुख्याध्यापक मनोज कवठे यानी केले.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704