https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
क्रीडा व मनोरंजन

कारगिल चौक दुर्गा उत्सव मंडळाच्या वतीने दुर्गा देवी चे उत्साहात विसर्जन     

गडचिरोली,प्रतिनिधी :-

गडचिरोली येथील कारगिल चौक स्थित कारगिल चौक दुर्गा उत्सव मंडळाच्या वतीने स्थापित दुर्गा देवी चे विसर्जन 7 ऑक्टोबर रोजी मोठ्या उत्साहात करण्यात आले. 9 दिवस चाललेल्या नवरात्रोत्सव दौरान या वर्षी प्रथमतः गरबा दांडिया स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सोबत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या सर्व कार्यक्रमात नागरिकांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला होता. 9 दिवस चाललेल्या गरबा दांडिया मध्ये विजेत्यांना पारितोषिक आणि प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. 4 ऑक्टोबर रोजी घेण्यात आलेल्या गरबा दांडिया स्पर्धेत विविध 9 संघांनी सहभाग घेतला. यात प्रथम 3 विजेत्यांना विदर्भ हिरो ऑटोमोबाईल चे संचालक अशोक प्रजापती यांच्या तर्फे रोख राशी आणि प्रमाणपत्र देण्यात आले.

या स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त टायगर ग्रूप ला 3 हजार 100, द्वितीय क्रमांक फ्रेंड्स फोरेवर ग्रूप ला 2 हजार 100 आणि तिसरा क्रमांक प्रगती ग्रूप ला 1 हजार 100 रू. रोख आणि प्रमाणपत्र विदर्भ हिरो ऑटोमोबाईल चे संचालक अशोक प्रजापती यांच्या हस्ते देण्यात आले.

मंडळा तर्फे घेण्यात आलेल्या ओटी स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला. दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी मंडळाच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या महाप्रसादाचा लाभ मोठ्या संख्येने नागरिकांनी घेतला.

शुक्रवारी गोपाळकाला करून मोठ्या उत्साहात देवी चे विसर्जन करण्यात आले. विसर्जन दरम्यान काढण्यात आलेल्या मिरवणुकीत परिसरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कारगिल चौक दुर्गा उत्सव मंडळाचे अध्यक्ष उदय धकाते, उपाध्यक्ष रेवनाथ गोवर्धन, सचिव प्रकाश भांडेकर, कोषाध्यक्ष प्रकाश धकाते, प्रवीण कुंभारे, दिलीप माणूसमारे, डॉ.नरेश बिडकर,सुनील देशमुख,नरेंद्र चन्नावार, महेन्द्र मसराम, विजय सुरपाम,वैभव रामटेके,रोहीत आत्राम,राजेश डोंगरे,प्रशांत डोंगरे,साहिल गोवर्धनताजीसा कोडापे,हरिष आत्राम,विक्की मसराम,राज डोंगरे,अवी शेंडे,अजय सुरपाम,अजय मसराम,अंकुश बाररसागडे,साहिल शेडमाके,निखिल वाकडे,आकाश कुळमेथे,यश कुळमेथे,रुपेश सलामे, विक्की मसराम, विक्की डोंगरे,अनिकेत बांबोळे, जयंत मोरे,गुंजन थुळकर, सुचिता धकाते, नीलिमा देशमुख, रुपाली शेरके, वनिता भांडेकर, वनिता धकाते, प्रमिला कुंभारे, वंदना लाकडे, वर्षा काकपुरे, मनीषा धकाते, संघमित्रा थुलकर, रक्षा थुलकर, विद्या कुमरे सह मंडळाच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704