https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
राजकीय

दुध व कृषी उत्पादनावर, अवाजवी लावलेली जीएसटीची दरवाढ रद्द करा-वंचित

  - वंचित बहुजन आघाडीची प्रधानमंत्र्यांकडे मागणी

गडचिरोली,प्रतिनिधी :- 

         करमुक्त स्थानिक डेअरी आणि कृषी उत्पादने ह्यावर लादलेल्या जीएसटीमूळे महागाईत अवाजवी वाढ झाली आहे त्यामूळे दरवाढ रद्द करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन वंचित बहुजन आघाडीने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना जिल्हाधिकारी संजय मिना यांच्या मार्फत पाठविलेल्या निवेदनातून केली आहे

         वंचित बहुजन आघाडीच्या  शिष्ठमंडळाने जिल्हाध्यक्ष बाळू टेंभुर्णे यांच्या नेतृत्वात  जिल्हाधिकारी संजय मिना यांची भेट घेतली यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव योगेंद्र बांगरे, उपाध्यक्ष जी के बारसिंगे, महिला आघाडीच्या मालाताई भजगवळी, जिल्हा उपाध्यक्ष पुरूषोत्तम बांबोळे, आयटी प्रमुख संदिप सहारे, जिल्हा सदस्य संदिप गेडाम, सदस्य भोजराज रामटेके, सचिन मेश्राम, दिलीप बांबोळे, प्रफुल मेश्राम, स्नेहदिप देवतळे आदिंचा शिष्ठमंडळात समावेश होता

         प्रधानमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वाढत्या महागाईमूळे सामान्य जनता त्रस्त असतांना जनतेला पुन्हा महागाईच्या खाईत  ढकलण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून 18 जुलै पासून आता अनेक दैनंदिन वस्तूसाठी नागरिकांना जास्तचे पैसे मोजावे लागणार आहेत , आजपर्यंत करमुक्त असलेल्या स्थानिक डेअरी आणि कृषी उत्पादनांवर देखील जीएसटी लादण्याचा निर्णय घेण्यात आल्याने महागाईत प्रचंड वाढ होणार आहे,

       जीएसटी कौन्सिलच्या बैठकीनंतर अर्थमंत्री निर्मला सितामन यांनी काही नविन उत्पादने , वस्तू आणि सेवांवरील जीएसटीचे दरवाढ जाहिर केले आहे, त्यात पाच टक्के कर दर स्लॅब अंतर्गत राज्याच्या अर्थमंत्र्यांच्या पॅनेल  आणि फिटमेंट कमिटीच्या शिफारशी स्विकारण्यात आल्या आहेत त्यानुसार प्रचंड दरवाढ होणार असल्याचेही निवेदनात म्हटले आहे,

        पुढे निवेदनात म्हटले आहे की, पनीर, लस्सी, ताक, पॅकेज केलेले दही, गव्हाचे पीठ ईतर कडधान्ये, तृणधान्ये , मध, पापड, अन्नधान्य,मांस आणि मासे ( फ्रोजन वगळता ) मुरमूरे आणि गुळ यारखी कृषी उत्पादने ह्यावर लादलेल्या जीएसटीमूळे प्रचंड दरवाढ होणार आहे , आतापर्यंत ब्रॅंडेड आणि पॅकेज केलेल्या खाद्यपदार्थावर पाच टक्के जीएसटी आकारले जात होते तर अनपॅक केलेल्या व लेबल नसलेल्या वस्तू करमुक्त होत्या अशा सामान्य जनतेच्या हिताच्या आणि दैनंदिन वापराच्या वस्तू जीएसटीच्या कक्षात समाविष्ट केल्याने  केंद्र सरकारने सामान्य माणसाच्या आयुष्यात आणखी अडचणी वाढविल्या, त्यामूळे  गोरगरिबांना हालअपेष्टा सहन कराव्या लागणार असल्याने ही दरवाढ मागे घ्यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704