https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

के के एम महाविद्यालयात नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण या विषयावर एक दिवशीय कार्यशाळा संपन्न

मानवत / प्रतिनिधी.
दिनांक 11ऑगस्ट 2023 रोजी के के एम महाविद्यालय मानवत या ठिकाणी राष्ट्रीय शिक्षण धोरण या विषयावर एकदिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ही कार्यशाळा के के एम महाविद्यालय मानवत व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडली, कार्यशाळेसाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडचे विज्ञान आणि तंत्रज्ञान शाखेचे अधिष्ठाता डॉ. एम. के. पाटील हे साधन व्यक्ती म्हणून उपस्थित होते या प्रसंगी त्यांनी नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले, नवीन शिक्षण धोरण हे तरुणपिढी ला सकारात्मक दिशेनं घेऊन जाण्यास व मूल्य रुजविण्यात सफल होईल असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला.
शैक्षणिक वर्ष 2023-24 पासून नवीन शैक्षणिक धोरणाचा स्वीकार स्वा. रा. ती. म. विद्यापीठ करणार असल्याचे ही निर्देश त्यांनी दिले. या एक दिवसीय कार्यशाळेेस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.भास्कर मुंडे हे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते त्यांनी या कार्यक्रमाचा अध्यक्ष समारोप केला. या प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. के.जी. हूगे, डॉ. बी. एस. गीते, महविद्यालयतील प्राध्यापक उपस्थित होते या कार्यशाळेचे समन्वयक डॉ. एस के शिंदे यांनी सूत्रसंचालन केले व डॉ. एस आर राठी यांनी आभार मानले या कार्यशाळेसाठी मानवत तालुक्यातील अनेक महाविद्यालयाच्या प्राचार्य, प्राध्यापक बंधू भगिनींनी सहभाग नोंदविला

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704