https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

कोथाळा येथे लोक वर्गणीतुन उभारण्यात आल्या वर्ग खोल्या अनेक शिक्षण प्रेमी नागरिकांचा सहभाग

मानवत / प्रतिनिधी.

मानवत तालुक्यातील कोथाळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा वर्ग खोल्या लोकवर्गनितून उभारण्यात आल्या या साठी अनेक शिक्षणप्रेमीनागरिकांनी सढळ हाताने मदत केली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विदयार्थ्यांना बसण्यासाठी वर्ग खोल्याची संख्या कमी होती ही बाब लक्षात घेता शिक्षण हे मुलांचे उद्याचे भावीतव्य असून इच्छा तिथे मार्ग निघतो याच वाक्याप्रमाणे अनेक शिक्षण प्रेमीनी लोक वर्गनितुन या वर्ग खोल्या उभारल्या आहेत या वर्ग खोल्याचे उदघाटन करुन विदयार्थ्यांना बसण्यासाठी उपलब्ध करुन देण्यात आल्या यावेळी जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्या सह सन्माननिय ग्रामपंचायत सदस्य तसेच कोथाळा येथील ग्रामस्थ शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षक वृंद मोठया संख्येने उपस्थित होते. अनेकांचा आर्थिक सहकार्याने या ठिकाणी एकदम मजबूत आशा दोन वर्गखोल्या व पत्र्याचे संरक्षक भिंत तयार करण्यात आली. ज्यांनी ज्यांनी या कामास मोलाचे सहकार्य करुन मदत केली त्यांचे शाळेचा वतीने आभार व्यक्त करण्यात आले.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704