https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
निवडणूक

राष्ट्रपती निवडणूक २०२२; निवडणूक मतपेटी दिल्लीकडे रवाना

मुंबई,विशेष प्रतिनिधी :-

भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांच्यामार्फत आज सोमवार दिनांक 18 जुलै 2022 रोजी सेंट्रल हॉल, विधान भवन, मुंबई येथे राष्ट्रपती पदाकरिता मतदान प्रक्रिया पार पडली. मतदानानंतर सीलबंद मतपेटी आणि इतर निवडणूक साहित्य नवी दिल्ली येथे पाठविण्यात आले आहे.

महाराष्ट्र विधान मंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र भागवत, उप सचिव तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी ऋतुराज कुडतरकर आणि अवर सचिव सुभाष नलावडे यांनी सदर निवडणूक मतपेटी आणि इतर सीलबंद साहित्य छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई येथून विमानाद्वारे राज्यसभा सचिवालय, नवी दिल्ली येथे नेण्यासाठी प्रयाण केले.

राष्ट्रपतीपदासाठीची या निवडणुकीत एकूण २८३ सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावला असून 5 सदस्य आपला मतदानाचा हक्क बजावू शकले नाही. दिवसभर चाललेली ही मतदान प्रक्रिया शांतपणे पार पडली असल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी सांगितले आहे.

Chief Editor

SHARE

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704