https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
निवडणूक

नागपूर विभागातील शिक्षक मतदारसंघ कार्यक्रम जाहीर

गडचिरोली,प्रतिनिधी :-

दिनांक 28 आक्टोबर 2022 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे दिनांक 01 नोव्हेंबर 2022 या अर्हता दिनांकावर आधारीत नागपूर विभागातील शिक्षक मतदार संघ कार्यक्रमाकरीता जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे पत्रकार परिषदेचे आयोजन अतिरिक्त जिल्हाधिकारी धनाजी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आले.

पुनरीक्षण कार्यक्रमाचे टप्पे व कालावधी पुढीलप्रमाणे आहे. मतदार नोंदणी अधिनियम 1960 चे कलम 31(3) अन्वये जाहीर सूचना प्रसिद्ध करण्याचा दिनांक दि. 01 ऑक्टोंबर, 2022 (शनिवार) आहे. मतदार नोंदणी अधिनियम 1960 चे कलम 31(4)अन्वये वर्तमानपत्रातील नोटीसीची प्रथम पुर्नप्रसिद्धी दिनांक दि. 15 ऑक्टोंबर, 2022 (शनिवार), मतदार नोंदणी अधिनियम 1960 चे कलम 31(4)अन्वये वर्तमानपत्रातील नोटीसीची द्वितीय पुर्नप्रसिद्धी दि. दि. 25 ऑक्टोंबर, 2022 (मंगळवार), नमुना 18 किंवा 19 द्वारे दावे व हरकती स्वीकारण्याचा अंतिम दिनांक  07 नोव्हेंबर, 2022 (सोमवार), हस्तलिखिते तयार करणे व प्रारुप मतदार याद्यांची छपाई दि. 19 नोव्हेंबर, 2022 (शनिवार), प्रारुप मतदार याद्यांची प्रसिद्धी दि. 23 नोव्हेंबर, 2022 (बुधवार), दावे व हरकती हरकती स्वीकारण्याचा कालावधी दि. 23 नोव्हेंबर, 2022 (बुधवार) ते दि.9 डिसेंबर,2022 (शुक्रवार), दावे व हरकती निकाली काढण्याचा दिनांक व पुरवणी यादि तयार करणे व छपाई करणे दि. 25 डिसेंबर, 2022 (रविवार ), मतदार यादिची अंतिम प्रसिद्धी दि. 30 डिसेंबर, 2022 (शुक्रवार).

            शिक्षक मतदार संघ निवडणूक – 2016-17 या कालावधीमध्ये एकुण जिल्हामध्ये मतदान केंद्र 18 होते व एकुण मतदार 3073          असे होते. व 2022-2023 मधील शिक्षक मतदार नोंदणी करीता दिनांक 27.10.2022 पर्यंत एकुन नमुना अर्ज प्राप्त- 1959 असे आहे.

मतदार नोंदणीसाठी पात्रता पुढील प्रमाणे आहे.

भारताचा नागरीक असावा. मतदार संघातील सर्वसाधारण रहीवासी असावा. 1 नोव्हेंबर 2022 पूर्वी लगतच्या सहा वर्षातील किमान तीन वर्षे अध्यापनाचे पुर्ण काम माध्यमिक शाळेपेक्षा कमी दर्जा नसलेल्या संस्थेत शिक्षक असावा. पाट टाईम किंवा तासीका निहाय काम करणारे शिक्षक मतदार म्हणून नोंदणी करण्यासाठी अपात्र आहेत. शिक्षक मतदार संघाच्या मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याकरीता नमुना 19 मध्ये अर्ज भरावा. नमुना 19 मध्ये आधार क्रमांक सादर करणे हे मतदाराच्या वतीन ऐच्छिक आहे. सर्व मतदारांना नव्याने मतदार नोंदणी करणे आवश्यक.

 आवश्यक कागदपत्रे – रहिवासी पुरावा (मतदार ओळखपत्र / आधार कार्ड / पासपोर्ट / वाहन चालक परवाना / वीज-पाणी-गॅस जोडणीचे देयक इत्यादी ) विहीत नमुन्यातील शैक्षणिक संस्थेच्या प्रमुखाचे प्रमाणपत्र. कागदपत्रातील नावात बदल असल्यास राजपत्र / विवाह नोंदणी प्रमाणपत्र / संबंधीत कायदेशीर पुरावा.

           (वरील कागदपत्रांची प्रत स्वयंसाक्षांकित व पदनिर्देशित अधिकाऱ्याकडुन अधिप्रमाणित करुन जोडणे आवश्यक) शिक्षक मतदारसंघ निवडणूक 2022 करिता नमुना 19 चे फार्म सर्व तहसिल कार्यालय व पदनिर्देशीत ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहेत.

Chief Editor

SHARE

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704