यशवंत महाविद्यालयात प्लेसमेंट ड्राईव्हचे यशस्वी आयोजन

नांदेड:(दि.१९ जुलै २०२५)
भारताचे माजी गृहमंत्री, आधुनिक भगीरथ जलनायक कै. डॉ. शंकररावजी चव्हाण जयंतीनिमित्त यशवंत महाविद्यालयात ‘इन्स्टिट्यूट फॉर अॅडव्हान्स्ड स्टडीज’ यांच्या सहकार्याने माजी प्र- कुलगुरू प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे यांच्या नियोजनानुसार भव्य प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले.
या उपक्रमाचे उद्घाटन साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त जेष्ठ साहित्यिक डॉ.सुरेश सावंत यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे होत्या.
या उपक्रमाचे आयोजन प्लेसमेंट समिती समन्वयक डॉ.मदन अंभोरे, सदस्य डॉ.योगेश नकाते, डॉ.निलेश चव्हाण, प्रा. नारायण गव्हाणे, डॉ. साईनाथ बिंदगे, डॉ. रत्नमाला मस्के, डॉ. मोहम्मद आमेर, डॉ. अनिल कुंवर यांच्या परिश्रमाने संपन्न झाले.
उपक्रमाच्या यशस्वीतेकरिता प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन. शिंदे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये एकूण तीन फेऱ्यांमध्ये विद्यार्थ्यांची निवड प्रक्रिया पार पडली. अंतिम फेरीत ५ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली, हे या उपक्रमाचे मुख्य यश ठरले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्य डॉ.एच.एस.पतंगे, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या समन्वयिका डॉ. एल.व्ही.पद्माराणी राव, डॉ.साहेबराव शिंदे, प्रा. माधव दुधाटे, डॉ. एन. ए. पांडे, डॉ.अजय गव्हाणे, प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील यांचे सहकार्य लाभले.
हा प्लेसमेंट उपक्रम केवळ विद्यार्थ्यांसाठी रोजगाराच्या दृष्टीने नव्हे; तर आत्मविश्वास वृद्धीसाठीही उपयुक्त ठरला.