ताज्या घडामोडी

डॉ.अजय गव्हाणे यांना दि.६ जुलै रोजी पुरस्कार

नांदेड:(दि.५ जुलै २०२५)
यशवंत महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ.अजय वसंतराव गव्हाणे यांना जनसहयोग सेवाभावी संस्था, परभणीच्या वतीने राष्ट्रीय रत्न पुरस्कार: २०२५ द्वारे सन्मानित करण्यात येणार आहे.
सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या जनसहयोग सेवाभावी संस्थेच्या वतीने दरवर्षी विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार दिला जातो.
सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, वैद्यकीय, कला, संगीत, साहित्य, संस्कृती, स्वच्छता, उद्योग, पर्यावरण, उत्कृष्ट सेवा अशा विविध क्षेत्रात कार्यरत राहून समाज निर्मितीचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना हा पुरस्कार दिला जातो.
डॉ.अजय गव्हाणे यांना सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते दि.६ जुलै, रविवार रोजी विसावा सभागृह, स्टेशन रोड, परभणी येथे राष्ट्रीय रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे, असे संस्थेचे अध्यक्ष व संयोजक महमूद खान, प्रा.अरुण पडघन आणि मीडिया चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्ष डॉ.कामिनी पाटील यांनी निवड पत्राद्वारे कळविले आहे.
पुरस्काराचे निवड पत्र प्राप्त झाल्यानंतर माजी प्र-कुलगुरु प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे, उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे तथा डॉ.हरिश्चंद्र पतंगे, प्रबंधक संदीप पाटील, राज्यशास्त्र विभागातील सहकारी डॉ. वीरभद्र स्वामी, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.कबीर रबडे, पर्यवेक्षिका प्रा.वंदना बदने, प्रा. ओमप्रकाश गुंजकर, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, विविध विभागप्रमुख, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.