जय हिंद पब्लिक स्कूल मध्ये आषाढी निमित्त दिंडी

—————————————
उदगीर:- येथील स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ संचलित जय हिंद पब्लिक स्कूल व ज्युनियर कॉलेज येथे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा प्राचार्य डॉ.सुधीर जगताप व संस्थेच्या प्रशासकीय अधिकारी ज्योती स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली आज आषाढी एकादशी निमित्त शाळेच्या पटांगणात आषाढी दिंडी चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जय हिंद पब्लिक स्कूलच्या प्राचार्या डॉ. कृष्णा कथुरिया, मनोरमा शास्त्री, सतीश वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या दिंडीत शाळेच्या विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभूषेत टाळ मृदंगाच्या गजरात हरिनामाचा जप करत दिंडीत अभंग व भजन गायले.या दिंडीत विठ्ठल रुक्मिणीच्या वेशभूषेत नटून आलेल्या विद्यार्थ्यानी सर्वाचे लक्ष वेधून घेतले व रिगण करित फुगडीचा फेरा घेतला.
सदरील दिंडी ही यशस्वी करण्यासाठी भाग्यश्री वांगवड, अजीत जाधव यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले तर अमितकुमार सोनकांबळे, सुनील ममदापूर, सूर्यकांत कांबळे, प्रशांत सावंत, प्रशांत पाटोडेकर, आश्लेषा, सोमनाथ सूर्यवंशी यांच्या सह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.