ताज्या घडामोडी

तालूक्यातील घरकूल लाभार्थ्यांना गोदा– दूधनेच्या कूशीतून प्रत्येकी पाच ब्रास वाळू मिळणार तहसिलदार, पांडूरंग माचेवाड.

मानवत / प्रतिनिधी.

मानवत तालुक्यातील घरकुल लाभार्थी यांना ५ ब्रास रेती मोफत उपलब्ध करुन देणे
शासनाने घरकुल लाभार्थी यांना ५ ब्रास पर्यंत मोफत रेती उपलब्ध करुन देण्याचा निर्णया घेतला असून या बाबत शासन निर्णय महसूल व वन विभाग दि.०८ एप्रिल २०२५ व दि. ३० एप्रिल २०२५ अन्वये निर्गमीत केला आहे.
त्यानुसार मानवत तालुक्यातंर्गत सद्य स्थितीत बांधकाम सुरु असलेल्या *१३६* घरकुल लाभार्थी यांची यादी गट विकास अधिकारी पंचायत समिती मानवत यांचे मार्फत प्राप्त झाली आहे. प्राप्त यादीनुसार घरकुल लाभार्थी यांना रेती उपलब्ध करुन देण्यासाठी तहसिल प्रशासनाच्या वतीने मानवत तालुक्यातील *दुधना* नदीवरील मौ. सावंगी मगर व *गोदावरी* नदीवरील मौ. कुंभारी हे रेती स्थळ निश्चित करण्यात आले आहे.
यामध्ये मौ. सावंगी मगर येथून २८०० ब्रास व मौ. कुंभारी येथून १५०० ब्रास रेती उपलब्ध करुन देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सदर रेतीची वाहतूक ही शासनाचे *Mahakhanij* या प्रणालीचा अवलंब करुन eTP द्वारे (Online वाहतूक पास) रेती वाहतूक करावयाची आहे. या करिता या Mahakhanij या प्रणालीवर रेती स्थळ व लाभार्थी यादी Upload करण्यात आली आहे. तसेच रेती वाहतूक करिता मानवत पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांना वाहतूक पास उपलब्ध करुन देण्यात आल्या असून सदर वाहतूक पास लाभार्थी यांना ग्रामसेवक / RHE (Rular Housing Engineer) यांचे मार्फत घरपोच उपलब्ध पोहच करण्याबाबतची कार्यवाही करण्यात आली असल्याची माहिती मानवत तहसिलचे तहसिलदार पांडूरंग माचेवाड यांनी दिली आहे.
या आदेशा संबंधीची माहिती प्रशासनाच्या वतीने मा. जिल्हाधिकारी परभणी , मा. उपविभागीय अधिकारी पाथरी, जिल्हा माहिती अधिकारी यांना देवून कळविण्यात आली असल्याची माहिती तहसिलदार पांडूरंग माचेवाड यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात नमूद केली आहे.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.