राष्ट्रीय* चर्मकार महासंघाच्या वतीने गटई कामगारांना छत्री वाटप.

मानवत / प्रतिनिधी.
——————————————
मानवत येथे व्यंकटेश फुटवेअर समोर राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे विदर्भ प्रमुख आदरणीय श्री संबा वाघमारे यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने गटई कामगारांना ऊन वारा पाऊस यापासून संरक्षण होण्यासाठी छत्री व गटई व्यवसायाला अवश्य असणारे ( अवजारे ) सामानाची किट वाटप करण्यात आले. यावेळी लाभार्थी म्हणून उपस्थित असलेले बाबासाहेब शिंदे, मारोती ठोंबरे, दत्ता कांबळे, नागोराव नांदुरे, केशव कांबळे, तसेच या कार्यक्रमाला उपस्थित असलेले राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राज्य उपाध्यक्ष नरहरी सोनवणे, हिंगोली महिला जिल्हाध्यक्षा मनीषा गायकवाड, परभणी जिल्हा अध्यक्ष मुरली ठोंबरे, मानवत तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर पानझाडे, सचिव विलास पतंगे, सल्लागार देविदास पाटील, पद्माकर पोहेकर, आशाताई पोहेकर, सिंधुताई सोनवणे, चर्मकार समाजातील बंधू भगिनी उपस्थित होते.
***