एम सी आर

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात आंतरराष्ट्रीय खगोलभौतिकी परिषद

Uncategorized

नांदेड:

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथील गणितीयशास्त्रे संकुलाच्या वतीने “इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन अस्ट्रोफिजिक्स, ग्रॅव्हिटेशन अँड कॉस्मोलॉजी (आयसीएजीसी-२०२६)” या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन दि. १३ व १४ फेब्रुवारी, २०२६ रोजी करण्यात आले आहे. या परिषदेसाठी आतापर्यंत देश-विदेशातील सुमारे २०० प्रतिनिधींनी नोंदणी केली असल्याची माहिती आयोजकांतर्फे देण्यात आली आहे.
ही आंतरराष्ट्रीय परिषद विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित होत असून प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन यांचे विशेष सहकार्य लाभत आहे. परिषदेच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव तसेच गणितीयशास्त्रे संकुलाचे संचालक डॉ. ज्ञानेश्वर पवार हे संयोजक म्हणून कार्यरत आहेत.
या परिषदेमध्ये जपान, दक्षिण आफ्रिका व तुर्की येथील नामवंत शास्त्रज्ञ सहभागी होणार आहेत. यामध्ये डॉ. शिंजी मुकुहियामा (जपान), डॉ. एर्टन गुडेकी (तुर्की) व डॉ. अरुणकुमार बीशम (दक्षिण आफ्रिका) यांचा प्रामुख्याने समावेश आहे. तसेच देशातील अनेक नामवंत शास्त्रज्ञ व संशोधक या परिषदेला उपस्थित राहणार आहेत.
परिषदेदरम्यान खगोलभौतिकी, गुरुत्वाकर्षण सिद्धांत, सापेक्षतावाद, विश्वरचना, कृष्णविवर, गुरुत्वीय तरंग, डार्क मॅटर व डार्क एनर्जी या अत्याधुनिक विषयांवर व्याख्याने, शोध निबंध सादरीकरण तसेच चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे.
या परिषदेच्या यशस्वी आयोजनासाठी गणितीयशास्त्रे संकुलातील प्राध्यापक, संशोधक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर परिश्रम घेत असून नोंदणी, तांत्रिक व्यवस्था व शैक्षणिक सत्रांच्या नियोजनामध्ये ते सक्रिय सहभाग घेत आहेत.
या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या माध्यमातून नांदेड व मराठवाडा विभागातील संशोधन संस्कृतीला चालना मिळणार असून, विद्यापीठाचे शैक्षणिक व संशोधन क्षेत्रातील योगदान आंतरराष्ट्रीय पातळीवर अधोरेखित होईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
—————————————-

Share

Related posts

घरफोडी प्रकरणातील आरोपी १२ तासांत जेरबंद; १९.६१ लाखांचा मुद्देमाल जप्त

Chief Editor

यशवंत ‘मधील प्रा.ओमप्रकाश गुंजकर यांचे राष्ट्रीय स्पर्धेत सुयश

Chief Editor

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेचा लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक नोंदणी व आधार प्रमाणीकरण तातडीने पूर्ण करावे – सहाय्यक निबंधक अशोक राठोड यांचे आवाहन

Chief Editor

स्वारातीम विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

Chief Editor

यशवंत ‘चे जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये घवघवीत यश

Chief Editor

राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत ठाणे, मुंबईच्या खेळाडूंनी गाजविले मैदान : महापौरांच्या हस्ते बक्षिक वितरण थाटात संपन्न

Chief Editor

Leave a Comment