गावाला शाळेचा अभिमान आमदार राजेश दादा विटेकर यांनी दिली जि.प. लोणी शाळेस भेट.

mcr.news / manawat
Anil chavan
————————————
दिनांक 12 फेब्रुवारी रोजी पाथरी विधान सभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार मा. राजेश दादा विटेकर यांनी लोणी जिल्हा परिषद शाळेस भेट दिली व जाणून घेतले शाळेतील विविध उपक्रमा विषयी सखोल माहिती या वेळी प्रथमता शाळेतील विद्यार्थिनींनी आमदार मा. राजेश दादा विटेकर यांचे शाळेच्या व गावकर्यांच्या वतीने औक्षण करून शाळेत त्यांचे स्वागत केले. त्यानंतर मूख्याध्यापक यांच्या कार्यालया मध्ये आमदार राजेश दादा विटेकर व त्यांचे सर्व सहकारी यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्या नंतर शाळेचे मुख्याध्यापक श्री चिंचाने सर यांनी शाळे विषयी थोडक्यात माहिती आमदार राजेश विटेकर यांना करून दिली.
यावेळी इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी शाळेतील सर्व सोयी सुविधांची माहिती इंग्रजीतून आमदार विटेकर यांच्या समोर सादर केली . शाळेतील सर्व उपक्रम या विषयी आमदार साहेबांना दाखवण्यात व सांगण्यात आले. त्यानंतर शाळेची विद्यार्थिनी धनश्री गिराम हिने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आधारित भाषण आमदार साहेबांसमोर करून दाखवले. आमदार साहेबांनी सर्व विद्यार्थ्यांचे तोंड भरून कौतुक केले. व शाळेला सर्व त्या गरजा निश्चितपणे पूर्ण करू असे आश्वासन दिले . त्यानंतर आमदार साहेबांनी शाळेतील वाचनालय व स्पर्धा परीक्षा हॉल ला भेट दिली व शाळेतील अनेक योजना, सुविधा उपक्रम पाहून समाधान व्यक्त केले. शाळेची गुणवत्ता पाहून सर्व विद्यार्थ्यांचे शिक्षकांचे व मुख्याध्यापक यांचे सर्वांचे अभिनंदन केले व शाळेला यापुढे ज्या काही गरजा लागतील त्या सर्व गरजा पूर्ण करू असे आश्वासन दिले.आमदार साहेबांसोबत गावातील श्री गजानन धर्मे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री दत्ताराव जाधव, श्री महेंद्र नाना धर्म, श्री राजाभाऊ राऊत, श्री कोंडीराम धर्मे, श्री कृष्णा धर्मे , श्री मोबीन शेख यावेळी वरील सर्वांचे सहकार्य लाभले.
***