ताडबोरगाव जिल्हा परिषद शाळेचे एन.एम.एम. एस. ( NMMS ) परीक्षेत तीन विद्यार्थ्यी उत्तिर्ण.

*
मानवत // प्रतिनिधी.
नुकताच एन एम एम एस परीक्षेचा निकाल जाहीर झाला त्यामधे मानवत तालूक्यातील ताडबोरगांव जिल्हा परिषद शाळेतील तीन विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. परिक्षेतील गुणवंत विद्यार्थी 1)कल्याणी गुंगाणे, 2) आरती पठाडे 3)श्रीनाथ भोकरे या विद्यार्थ्यांचा तसेच मार्गदर्शक शिक्षक, श्री. श्रीपाद माटेगावकर व दत्तात्रय जोजारे यांचा सत्कार शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री – उमरखान पठाण, सरपंच माऊली काजळे व मुख्याध्यापक श्री – अनील सावळे आणि उर्दू शाळेचे मुख्याध्यापक जूनेद खान यांच्या वतीने करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन तज्ञ शिक्षक श्री बलभीम माथेले यांनी केले तर आभार आदिल सर यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक वृंदांनी परीश्रम घेतले .
कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. उमरखान पठाण, सरपंच श्री माऊली काजळे, श्री दिगंबर पठाडे, श्री. यकीनखान पठाण, श्री बापुराव जंगले, गुलाबराव चिंचाणे , हाफीज इरफान खान यांच्या सह शिक्षणप्रेमी नागरिकांची या वेळी उपस्थिती होती.
*